बनावट साँनिटायझर व  बेकायदेशीर मास्क चा साठा

 बनावट साँनिटायझर व  बेकायदेशीर मास्कच्या  साठ्यावर 
जालना येथे अवैद्य साँनिटायझर एफ डी ए टाकला छापा आणि मास्कचा साठा जप्त.रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती,



जालना शहरातील जूना मोंढा येथील कल्पना एम्पोरियम या दुकानावर पुरवठा विभाग, अन्न भेसळ व औषध विभाग, पोलीस प्रशासन, जी.एस.टी. व वजनमापे विभाग यांची संयुक्तरित्या धाड.


रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती,


जालना शहरातील जुना मोंढा परिसरात एका दुकानावर अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट सॅनिटाईजर आणि अवैध मास्क चा साठा जप्त केला, अंदाजे 6 लाख रुपये किमितीचे हे साहित्य प्रशासनाने जप्त  केले असून  या कारवाईत 730 बनावट सॅनिटाईजर च्या बाटल्या आणि अवैध रित्या साठवलेले 18 हजार 900 मास्क जप्त केले,  सदर दुकानातून अवास्तव किमतीत मास्क ची विक्री केली जात असल्याची आणि बनावट सॅनिटाइझर चा साठा केल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती या माहिती वरून पोलिसांनी आणि  FDA  ने दुकानावर छापा घातला ,या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..