कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर चढवली दुचाकी

 


कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर चढवली दुचाकी


 


पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपाऱ्यात एका दुचाकी स्वाराने कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर दुचाकीचढवून पोलिस अधिकाऱ्याला जखमी केले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली आहे.


 


 


संपूर्ण देश संचारबंदी खाली आहे, कोरोनाचे थैमान देशासह महाराष्ट्रातही सुरू आहे. दररोज नवीन रुग्णांची यात भर पडत आहे. डॉक्टर, ईतर कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या साथीचा सामना करत आहेत. या साथीला पाय पसरू देऊनये म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे सरकार वारंवार सांगत आहे तरीही काही अतिशहाने लोक मात्र हे गांभीर्याने घेतांना दिसत नाहीत. तर टवाळखोर मात्र आपली मस्ती करत आहेत. या टवाळखोरांना रोखण्यासाठी पोलीस आपला जीव धोक्यात घालून लोकांना घरात राहण्यास सांगत आहे. पण, वसईमध्ये एका तरुणाने पोलिसांवरच गाडी घालून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे.


 


नालासोपारा येथे बुधवारी एका टवाळखोर दुचाकीस्वाराने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी चढवल्याची घटना घडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील गंभीर जखमी झाले आहेत


सुनील पाटील  नालासोपारा,वसईच्या  परिसरात वाकनपाडा विभागात आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांना काही टवाळखोर तरूण रस्त्यावर दुचाकी फिरवत असताना दिसले. या तरुणांना पोलीस पकडायला गेल्यावर हे तरुण दुचाकीस्वार पळ काढत होते. त्यावेळी सुनील पाटील एका दुचाकीसमोर उभे राहिले. या दुचाकीस्वाराने कोणतीही पर्वा न करता भरधाव वेगातील दुचाकी सुनील पाटील यांच्या अंगावर चढवली. त्यामुळे सुनील पाटील गंभीर दुखापत झाली त्यांच्या पाठीला डोक्याला,व इतर ठिकाणी मार लागला आहे. त्यांच्यावर सध्या वसईच्या आयसीएस रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले असून त्या दुचाकी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.