आमदारावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी महापौरांसह भाजपाच दबावतंत्र
सोमवारी सायंकाळी काशीमीरा पोलिस ठाण्यात महापौरांसह भाजपाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी यांनी आमदार गीता जैन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव बनवण्यासाठी काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजारे यांना घेराव केला.त्यामुळें पोलिसांचीही अचानक तारांबळ उडाली तर याची गीता जैन यांना माहिती मिळताच त्यांनी रात्रीच ८ : ३० वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.जेंव्हा पत्रकारांनी महापौरांना या संदर्भात विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राजकारण असावं दिलदार मित्रत्वाच असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर असही म्हणतात की राजकारण फार घाण झालेलं आहे. जय, पराजय होत असतो पण त्या जय पराजयाच्या पाठीमागे जेव्हा सुडाची भावना असते तेंव्हा मात्र त्या राजकारणाला स्तर राहिलेला नसतो. मग कोणत्याही कुरापती केव्हाही काढल्या जातात असाच काहीसा प्रकार मिरा-भाईंदर मधल्या राजकारणात दिसून आला आहे.
सोमवारी सायंकाळी काशीमीरा पोलिस ठाण्यात खोटी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत तक्रार दाखल करून घेण्यासाठी दबाव बनवण्याचा प्रयत्न भाजपा कडून केला गेला . या मुळे भाजपा नेत्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. महापौर जोस्तना हसनाळे-शिंदे , माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, धुर्वकिशोर पाटील,संजय थराडे, अनिता मुखर्जी, सचिन म्हात्रे, दिनेश जैन,अनिल भोसले,तुषार पारधी, हेमंत म्हात्रे सह अनेक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
२०१९ जुलै महिन्यात घडलेल्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमात भाजपा च्या दोन महिला नगरसेविके मध्ये झालेला विवाद घेऊन भाजपा च्या नगरसेविका रुपाली शिंदे-मोदी यांनी महापौरांच्या व आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आधार घेत आमदार गीता जैन यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दबावतंत्र वापरले पण यात त्याना यश मिळाले नाही.
काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजारे यांनी गुन्हा नोंद करून घेतला नाही . भाजपाने षडयंत्र करून दबाव बनवला खरा या दबावाला पोलिस बळी पडले नाहीत. आमदार गीता जैन यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर होत असलेल्या षड्यंत्राचा खुलासा केला. त्यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझ्यावर षडयंत्र करून खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा रचलेला डाव आहे कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह भाषा मी वापरली नाही. ६जुलै२०१९ला माझ्याहस्ते छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात रुपाली मोदी त्यांचे पती कार्यक्रमाच्या येऊन गोंधळ घालण्यास सुरवात केली . या ठिकाणी कार्यक्रम करायचा नाही हा शेड मी माझ्या नगरसेवक निधीतून बनवला आहे . तुम्ही आमची परमिशन घेतली का ?म्हणून अंगावर धावून आल्या त्या वेळी मी त्यांना धक्का दिला आणि कार्यक्रम संपल्यानंतर पोलिसांकडे या बाबत तक्रार केली. त्या वेळी पोलिसांनी नगरसेविका रुपाली मोदी व त्यांच्या पतीला काशीमीरा पोलिसांनी बोलावून घेतले होते . त्यावेळी त्यांनी जबाब नोंदवला होता त्यात त्यांनी आमची कोणतीही तक्रार नाही असे स्पष्ट पणे नमूद करून पोलिस ठाण्यात कामावर हजर असलेले पोलिस उपनिरीक्षक दीपक धनवटे यांच्याकडे अर्ज दिलेला होता असे सांगून गीता जैन यांनी त्या अर्जाची प्रत ही पत्रकारांना दाखवली.
राजकारणात छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात म्हणून मि दुर्लक्ष केले . सध्या देश कोरोनाच्या दहशतिखली आहे नागरिकांची सुरक्षा कशी करता येईल याची कामे करण्याऐवजी महापौर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबावतंत्र वापरण्यात व्यस्त आहेत. हे एक जाणून बुजून रचलेल षडयंत्र आहे . असा कोणताही प्रकार नाही. भाजपा पदाधिकारी सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा स्पष्ट आरोप गीता जैन यांनी यावेळी केला.
या संदर्भात महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्याकडे विचारणा केली असता कोणतीही घटना घडली तर तो थोडीही विसरली जाते केव्हा ना केव्हा ती आठवणीत येतच असते त्यामुळे मोदी मॅडम नि मला घडलेल्या घटने संदर्भात माहिती दिली आणि पोलिसांनी काय कारवाई केली आहे ते आपण पोलिस ठाण्यात विचारणा करू म्हणून आम्ही आलो आहोत. यात कोणतेही राजकारण नाही, आम्ही कोणतेही सूडबुद्धीचे राजकारण करत नाही आणि करू पण नये. नगर सेविका मोदी मॅडम च्या सोबत ८ महिन्यापूर्वी जी घटना घडली होती त्यामुळे त्या टेन्शन (मानसिक तणावात) होत्या त्यावेळी काय जवाब दिला आहे त्यावर काय कारवाई केली गेली आहे याची चोकशी करण्यासाठी आम्ही आलो होतो असा खुलासा महापौर जोस्तना हसनाळे-शिंदे यांनी केला.
मी न्याय मागण्यांसाठी आले होते अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत घडलेल्या घटने संदर्भात काय कारवाई केली आहे याची माहिती घेण्यासाठी आले होते. मी भाजपा पक्षात आहे आम्ही सर्व सोबत आहोत या पुढे मला न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष काम करेल आणि न्याय द्यायचा की नाही ते अधिकारी ठरवतील --- रुपाली शिंदे नगरसेविका मीरा-भाईंदर मनपा