टवाळखोरांना पोलिसांची भीती, टवाळखोरांमुळे सर्रास होतेय संचारबंदी चे उल्लंघन
पोलिस मदत पत्र : (मीरारोड )
कोरोनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव सरकारने रोखण्यासाठी केंद सरकारकडून १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असताना. देशासह महाराष्ट्रात आणि मीरा-भाईंदर शहरात देखील टवाळखोर संचार बंदीचे उल्लंघन करत रस्त्यावर फिरत होते अशा टवाळखोरांना स्थानिक पोलिसांन मार्फ़त लाठीचा प्रसाद मिळत होता. त्यामुळे अनेक टवाळखोर घरात बसने पसंद करू लागल्याने पालकवर्गामध्ये पोलिसांचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत.
मीरा भाईंदर मध्ये संचारबंदी लागू असताना देखील सर्रासपणे सर्वत्र नागरिक फिरताना दिसून येत होते.या मध्ये सर्वाधिक संख्या टवाळखोरांची होती. दुचाकी ,चारचाकी वाहने घेऊन बिना कामाचे फिरतांना दिसत होते. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर वाटेल तिकडे फिरण ,पोलिसांनी अडवल्यास काहीही खोटी कारण सांगून पळ काढणे या सर्वाला रोखण्यासाठी मीरा भाईंदर पोलिस प्रशासनाने काही टवाळखोरांना दंडुक्याचा प्रसाद देखील दिला. स्थानिक पोलिसांनी अखेरकार टवाळखोरात भीति बसावी या अनुषंगाने हे पाऊल उचलले जात होते. संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्याना दिसताच चोप मिळत असल्यामुळे टवाळखोरात भीती निर्माण झाली होती. रस्त्यावर फिरणे कमी झाले होतें. असेच वातावरण संपूर्ण देशात तयार केले होते पण काही व्हिडीओ शोशल मीडिया मध्ये व्हायरल झाल्यामुळे मुख्यमंत्री यांनी मावळ भूमिका घेत दंडुक्याने मारहाण करण्यात येऊ नये असे सांगितल्याने आणि पोलिस प्रशासनाकडून असे प्रकार घडला आणि तो व्हिडीओ जर शोशल मीडियात या अन्य अन्यमाध्यमातून मिळून आला तर त्या पोलिसावर कारवाई करण्यात येणार असे आदेश दिल्या मुळे पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.
सुरुवातीला पोलिसां मार्फ़त आपल्या मुलांना मारहाण होत असल्याने त्याचा विरोध देखील होऊ लागला मात्र आपल्याच मुलांची चूक असून बाहेर जाण्यास बंदी असून ही विणाकारण घरा बाहेर पडणे ,पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे अश्याना पोलिसांच्या माराचीच भीति योग्य आहे है पटल्यावर पालकवर्गा कडून याला विरोध दर्शवण बंद झालं तर पोलिसांच समर्थन पालकवर्ग आणि शहरातील सुज्ञ नागरिक करत आहेत.
कोरोना विषाणूमुळे मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये याकरता सरकारने सर्व परिक्षा पुढे ढकलल्या आहेत तर सर्व शाळा,कॉलेज बंद करण्यात आले .मात्र घरी बसण्याकरता देण्यात आलेल्या सुट्टीचा मुलांनी गैरफायदा घेण्यास सुरू केले आहे.
मेडिकल ,भाजी,किंवा हॉस्पिटलच्या नावाखाली टवाळखोरांनी परिसरात फिरण्यास सुरवात केली.एकमेकांच्या संपर्कात कोणी येऊ नये म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी असतांना देखील या तरुण पिढीला याचे गाभिर्य समजत नसून घरा बाहेर पडत आहे.
दारू किंवा अम्ली पदार्थाच्या सेवणाची सवय लागल्यामुळे तरुण पिढी त्याच्या शोधात बाहेर पडताना दिसत आहे.यामुळेच गुटखा,दारू,तंबाखू याची चढ्या भावात छुप्या मार्गाने विक्री केली जात आहे. घरच्याचे न ऐकणारे टवाळखोर पोलिसांच्या माराच्या भीतीपोटी घरी बसत असल्याने पालकवर्गात एक प्रकारचा आनंद व्यक्त होत आहे.यामुळे पोलिसांनी घेतलेले पाऊल योग्यच आहे अशा अनेक प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. पोलिसांनी भीती निर्माण करण्यासाठी चोप घ्यावा मात्र थोडे लक्ष द्यावे जेणे करूण टवाळखोरांना ईजा पोहचणार नाही अशीही भावना काही जणांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया :
पोलिसांच्या माराच्या भीतीमुळेच आमचा भाऊ घरा बाहेर पाऊल देखील ठेवत नाही त्यामुळे त्यांनी टवाळखोरांच्या मनात जी भीती निर्माण केली आहे ती योग्य आहे.
प्राची पांढरे ( पालक )
चाळीच्या वसाहतीतील अनेक तरुणांचे टोळके गप्पा, मस्करी, टाईमपास करत तर कुठे अंमली पदार्थांचे सेवन घोळक्याने करत दिसत होते. एकच बियर बाटली दहा ते पंधरा जण एकमेंकाना देत होतो या रिकाम्या टोळक्याने सर्वसामान्य नागरिकांना ही त्रास होत आहे किराणा दुकान, भाजीपाला, या औषध आणण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाहक या रस्त्यावर चौकात ठिय्या मारणाऱ्यांचा त्रास जाणवतं होता. पण पोलिसांच्या दंडुक्याने याला आळा बसला हे खरे आहे.
अनिकेेत देशमुख
(पत्रकार)