संचारबंदीत उपद्व्याप देणाऱ्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांची कारवाई
मिरारोड पूर्व : संचारबंदीचे गांभीर्य नसलेल्या, कायद्यांचे सर्रास पणे उल्लंघन करणाऱ्या रिकामटेकड्याकडून
वाहतुकीचे नियम मोडून पोलिसांना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करायला लावणाऱ्या दुचाकी चालकावर मीरा-भाईंदर मधील स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी पोलिसांनी कारवाई केली.
कोरोनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद सरकारकडून १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असताना देखील दुचाकी घेऊन विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्यानां अनेकदा पोलिसांनी दांडूक्याचा प्रसाद दिल्यानंतर पोलिसांच्या दांडूक्याचा मार चुकवण्याकरीता टवाळखोर छुप्या मार्गाचा वापर करून परिसरात फिरताना दिसून येत होते. लोकडाऊनच्या काळात
हे रिकामटेकड्याचां उपद्व्याप काही केल्या थांबत नसल्याने पोलिसांनी भाईंदर पुर्वच्या बीपी रोड, गोडदेव नाका या मुख्य नाक्यावर स्थानीक नवघर पोलीस व काशिमीरा वाहतूक पोलसांनी गस्त सुरू केली होती. विनाकारण घराबाहेर पडणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७० हुन अधिक दूचाकी वाहन चालकांवर कलम १७९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, कर्मचारी खरात, जितू नेवाळे तर वाहतूक कर्मचारी मनीष शिंदे, राजाराम कोळी यांनी लोकांनी स्वतःहुन घरात न थांबल्यास याहून अधिक मोठी कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे