राज्यसरकारकडून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे राज्यात १४४ कलम लागू आहे. लोकांनची गर्दी कमी व्हावी म्हणून जमावबंदी आदेशही जारी करूनही नागरिक मात्र बेपर्वाईने वागताना दिसत आहेत.
मुंबईतिल आणि उपनगरातील लोक आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबईत दहिसर,मुलुंड चेकनाक्यासह वेगवेगळ्या ठिकाणच्या नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहेला मिळत होती.
दहिसर पोलिसांनी मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखले आहे.
पंतप्रधानांच्या आवाहना नंतर काल संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. त्याला राज्यातील जनतेने घरातच राहून चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्यातील करोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला घरीच बसण्याचं आवाहन करत राज्यात जमाव बंदी आदेश लागू केले. ३१ मार्चपर्यंत जमाव बंदी आदेश लागू केल्याने राज्यातील जनता घरीच बसेल आणि सरकारला सहकार्य करेल असे वाटत होते पण मुंबईकरांनी खासगी वाहने बाहेर काढलीआणि रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत.
रेल्वे आणि बसेस बंद आहेत.राज्यात ३१तारखे पर्यन्त संचारबंदी लागू आहे . तरीही गर्दी झाली त्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील लोक कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने निघाले. तर ठाणे-कल्याणमधील लोक मुंबईच्या दिशेने खासगी वाहनांनी निघाले. त्यामुळे मुलुंड येथे सकाळी ९च्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणून पोलिसांनी मुंबईच्या दिशेने या वाहनांना जाऊ दिले. दहिसर चेक नाक्यावरही मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली होती. सायन रुग्णालयाजवळही हीच परिस्थिती होती. मुलुंड आणि सायन येथे वाहतूक कोंडी पाहेला मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून मुंबई आणि ठाण्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांना अटकाव करण्यास सुरुवात केली. नवी मुंबईत ऐरोली टोलनाक्यावरही सकाळी १०च्या सुमारास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मात्र, पोलीस प्रत्येकाला गाडी थांबवून त्याला घराबाहेर पडण्याचं कारण विचारत होते. योग्य कारण वाटल्यावरच या लोकांना सोडलं जात होतं.
काशीमीरा नाक्यावर वाहनांना पोलिसानी मुंबईत जाण्यापासून रोखले जात होते. त्यामुळे काशीमीरा नाक्यावर वाहनांची गर्दी झालेली दिसत होती.
मुंबईतील सर्व टोलनाक्यांवरील गर्दी ताबडतोबीने कमी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.तर वाहने रस्त्यावर आणून कायदा मोडू नये असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी असे आवाहन केले आहे. परिस्थितीची जाण ठेऊन जनतेने सहकार्य करावे असे सांगितले आहे.