अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या सवलतीचा ग़ैरफ़ायदा

अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या सवलतीचा ग़ैरफ़ायदा


मीरारोड  :  


                 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केंद्र शासनाकड़ून लॉकडाऊन  लागू करण्यात आला आहे. मीरा भाईंदर मधील काही अतिउत्साहित लोकांमुळे लॉकडाऊनचे गांभीर्य राहिले नसल्याचे  दिसून येत असून  रस्त्यावर लोकं शेकडोच्या प्रमाणात दिसत आहेत. परिणामी लॉकडाऊनचे शहरात तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊनचे आदेश मिळताच मीरा भाईंदर मधील पोलिसांनी चेकनाका, काशिमीरा नाका, एस .के.स्टोन, मॅक्सस मॉल आदी ठिकाणी नाकाबंदी सुरु केली आहे.  लोकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये  असे आवाहन करण्यात येत असतानाही परिस्थिती उलटी दिसून येत आहे. पालिकेने  दूध डेअरी , किराणा, फळ विक्रेता, भजिपाला  यांच्या दुकानावर ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. विना कारण बाहेर पडणाऱ्याना पोलिस कर्मचारी ठोकून काढत असले तरी देखील काही टवाळखोरांमुळे लॉकडाऊनचे तीनतेरा वाजू लागले आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या सवलतीचा ग़ैरफ़ायदा घेत  हे लोक रस्त्यावर फिरू लागले आहेत.