युवा सहास फाउंडेशनने केले गरीब व गराजूनां जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोरोनाच्या भीतीने हवालदिल झालेल्या, संचारबंदीत चिंतेत असलेल्या गरीब व गरजू कुटुंबाना समाजसेवावृत्ती असलेले "युवा सहास फाउंडेशन" यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे मोफत घरपोच वाटप करण्यात आले.
कोरोना रोगाच्या महामारीची संपूर्ण जगात सुरू झालेली साथ आणि त्या साथीचे भारतात वाढत चाललेले संक्रमण पाहता देशात सुरू असलेली संचारबंदीमुळे अर्थिक परिस्थितीने गांजलेल्या सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. मोलमजुरी करून परिवाराचा गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या समस्या दिवसंदिवस वाढत चालल्या आहेत.
घरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा नाही चूल कशी पेटवावी हा समोर पडलेला प्रश्न असताना काशीमीरा विभागातील समाजसेवा वृत्ती ठेवत "युवा सहास फाउंडेशन" यांनी ५०० कुटुंबांना मोफत अन्नधान्य देऊन त्यांना आधार दिला आहे.
जीवनावश्यक साहित्यामध्ये तांदूळ, डाळ,तेल,मीठ, चाय पत्ती, कांदे,बटाटे,बिस्कीट, अश्या स्वरूपात एक थैलीत भरून गरजू आणि गरीब परिवारांना दिनांक २८ मार्च रोजी दुपारी चार वाजता पासून ते रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी यांच्या मदतीने मोफत घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले आहे असे अब्दुल्ला यांनी सांगितले
कोरोनाच्या साथीचे थैमान आणि देशातील संचारबंदीत घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूला घरात घेण्यासारखे आहे त्यामुळे सर्वसामान्य भयभीत झालेला आहे.हया परिस्थितीचा सामना करताना घरात खाण्यासाठी अन्नधान्याची चणचण त्यामुळे अनेक कुटुंबांचे हाल होण्याची शक्यता आहे. त्यातच घराबाहेर पडल्यानंतर पोलीस बंदोबस्तामुळे दुकानापर्यंत जाण्यासह अनेक नागरिक का-कू करत आहेत.
काशीमीरा भागातील अनेकांचे पोट त्यांच्या हातावर आहे. अनेक उद्योगधंदे ठप्प असल्याने नागरिकांच्या हाताशी दोन पैसेही नाहीत. अशा सर्वच गरजुंना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. दोन घास पोटात असतील तर प्रत्येक संकटाचा सामना करण्याची हिंमत माणसात येते.सगळ्यात मोठी भूक ही पोटाची आहे. ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपल आयुष्यभर झगडत असतो पण सध्याची परिस्थिती ही आणीबाणी सारखी आहे.
हाताला काम नाही.घरा बाहेर पडायचे नाही अश्या परिस्थितीत खायचे काय हा प्रश्न गरिबांना भेडसावत आहेत.
सरकार त्यांच्या पद्धतीने उपाययोजना करत आहे. पण सध्या नागरिकांच्या जीवापेक्षा मौल्यवान दुसरं काहीच असू शकत नाही. गरीब व गरजू लोकांना दोन वेळेचं अन्न मिळणं ही सध्याची प्राथमिकता आहे. त्यात युवा सहास फाउंडेशनचा खारीचा वाटा असावा असं वाटत म्हणून आणि मानवतेच्या दृष्टीने माणूस म्हणून आमचं कर्तव्य आहे असे आम्ही मानतो असी प्रतिक्रिया युवा सहास फाउंडेशन चे अध्यक्ष अब्दुल्ला राईन यांनी दिली आहे.