" अपना घर " गृहसंकुलनातील वाढीव बांधकामावर लवकरच पडणार हातोडा
विधानमंडळ अधिवेशनात मिराभाईंदर महानगरपालिका मधील 711 कंपनीने उभारलेल्या "अपना घर " या गृहसंकुल चा मुद्दा उपस्थित केला गेला आणि वाढीव असलेले अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आले .
मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक 4 मधील वेस्टर्न हॉटेल च्या मागच्या बाजूस असलेल्या मौजे घोडबंदर येथील सर्वे नंबर 25/2, 111/1/1, 1/2, 112/1, "a" आणि "b" प्लॉट वर 711 कंपनीच्या माध्यमातून "अपना घर "गृहसंकुलं बांधण्यात आलेले आहेत यात 10 बिल्डिंग तयार करण्यात आलेल्या आहेत या इमारती परवानगी पेक्षा अधिक वाढीव बांधकाम करण्यात आलेले आहे. a प्लॉट वर उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बांधकामात वाढीव अधिक बांधकाम हे 5941.88 चौरस मीटर तर B प्लॉट असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या इमारतीवर वाढीव अधिक बांधकाम 5789. 57 चौरस मीटर इतक्या स्वरूपाचे अवैध बांधकाम केले गेले आहे हे ऐकून वाढीव बांधकाम 11731.45 चौरस मीटर एवढे बांधकाम केलेली आहे. दहा इमारतीमध्ये तब्बल 30 अवैद्य मजले बनवण्यात आले आहेत . या बांधकामाला मीरा भाईंदर मनपा अधिकाऱ्यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला . पण या अवैध बांधकामाचा मुद्दा महाराष्ट्राचा विधानमंडळ अधिवेशनामध्ये आमदार महोदयांनी या बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा उचलला गेल्यामुळे अखेर नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मिलिंद आवडे यांनी अवैध बांधकामावर तत्काळ तोडक कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना 25 फेब्रुवारी रोजी देण्यात आले त्यामुळे मीरा-भाईंदर मधल्या भाजपाच्या माजी आमदाराशी संबंधित असलेल्या सेव्हन इलेव्हन कंपनीला हा धक्का दिला असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. या इमारतीतील असलेले फ्लॅट हे शहरातीलअनेक भाजपा पदाधिकारी यांच्या ओळखीने व काशीमीरा मधील असलेल्या नगरसेविकेच्या कार्यालयातून याच इमारती मध्ये अनेक फ्लॅट विक्री केली गेली आहेत. त्यामुळे नगरसेवक यांच्यावर विश्वास ठेवून फ्लॅट विकत घेतलेल्या नागरिकांची फसवणूक तर होणार नाही ना ही भीती फ्लॅट विकत घेतलेल्या नागरिकांमध्ये वाढली आहे.