राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागु, रेल्वे, लोकल, एसटीला,उद्या सकाळपासून ब्रेक

राज्यात मध्यरात्रीपासून कलम १४४ लागु, रेल्वे, लोकल, एसटीला,उद्यापासून ब्रेक


कोरोनाचा फैलाव महाराष्ट्रात रोखण्यासाठी  मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. रस्त्यावर या सार्वजनीक ठिकाणी ५ पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना पोलीस ताब्यात घेऊन कारवाई करतील  असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.


 भारतीय रेल्वे ने ३१ मार्च पर्यंत सर्व रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर, राज्यसरकार ने मुंबईतील लोकल सेवाही सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्या सकाळ पासून बंद करण्यात येणार आहेत. असे  मुख्यमंत्री म्हणाले . 
 आता राज्यातील लालपरीलाही ३१ मार्चपर्यंत ब्रेक लावण्यात आला आहे. 


३१ मार्च पर्यंत राज्यातील बस सेवा (एसटी महामंडळ ने) बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री परब यांनी दिली.


कोरोनाचे  संक्रमण दिवसंदिवस वाढत आहेत. दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. या साथीचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी या उदभवलेल्या परिस्थितीत संपर्क टाळणे हाच एकमेव पर्याय आहे.  पुढील काही दिवस देशात कोरोना रोगाचा प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. . ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. म्हणूनच, मुंबई, महाराष्ट्रातल्या शहरी भागासह नागरी भागात १४४ कलम नाइलाजास्तव लावावे लागत आहे. कृपाकरून गर्दी टाळा ,५ पेक्षा अधिक जण एकत्र येणे टाळावे , टोळकं किंवा ग्रुपनं कुठे फिरू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. परदेशातून आता आपल्याकडे कोणी येणार नाही. आता आपले आपणच आहोत. आपल्यालाच या संकटावरती मात करायची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.