शहरातील जनतेला महापौरांचे अवाहन
कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरले आहे. या महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार खूप प्रयत्न करत आहे त्याच धर्तीवर शहराचे प्रशासन मिरा भाईंदर मधील जनतेची काळजी घेत आहे. शहरातील नागरिकांची जीवन आवश्यक वस्तूसाठी गैरसोय होऊ नये म्हणून, महानगरपालिकेच्या वतीने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मधील कोरोनाच्या
भाजीपाला दुकाने लावण्यात आले आहेत जनतेने याचा उपयोग करावा पण गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शहरातील जनतेने संयम ठेवत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेत समान खरेदी करावी जेणेकरून साथीच्या रोगाला आमंत्रण दिले जाणार नाही ही सतर्कता बाळगावी असे महापौर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
केंद्र शासनाने कोरोना (COVID-१९) चा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. उपाययोजनेचा भाग म्हणुन सर्व सामान्य जनतेने घरी राहण्याचे आवाहन केले आहे. सदर २१ दिवसाच्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये व नागरिकांच्या सोईकरिता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे भाजी मार्केटची सुविधा करण्यात आलेली आहे त्याच बरोबर शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुद्धा सुरू ठेवण्यात आले आहेत. शहरातील जनतेला कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी प्रशासना कडून घेतली जात आहे या साठी जनतेने घाबरून न जाता गर्दी गोंधळ न करता शासनाला सहकार्य करावे ही अशी विनंती जनतेला महापौरांनी केली आहे.
खालील ठिकाणी भाजीपाला जनतेसाठी उपलब्ध केली आहे.
१) रामदेव पार्क – मिरारोड (पूर्व)
२) लतीफ पार्क – एस.के.स्टोन समोर, मिरारोड (पूर्व)
३) मंगल नगर – हटकेश, मिरारोड (पूर्व)
४) आशा नगर – आर.एम.पी. पार्क, भाईंदर (पूर्व)
५) एल.बी.टी. कार्यालय – मॅक्सेस मॉलच्या मागे, भाईंदर (पश्चिम)
६) सुभाषचंद्र बोस मैदान – उत्तन रोड, भाईंदर (पश्चिम)
७) अल हजरत मैदान – कानुगो इस्टेट जवळ, पयाडे हॉटेलच्या मागे, मिरारोड (पूर्व)
८) बालाजी हॉटेलच्या मागे – शांती पार्क, मिरारोड (पूर्व)
९) मिनाताई ठाकरे मंडई – भाईंदर (पूर्व)
१०) सिल्व्हर सरिता बिल्डींग – काशीगाव जवळ
११) मॅक्सेस मॉल मैदान, भाईंदर (पश्चिम)
१२) नवघर शाळेचे मैदान, भाईंदर
१३) केबिन रोड स्वाति बिल्डिंग, हनुमान नगर
१४) मिरारोड सेकटर ४, मैदान
१५) मिरारोड सेकटर ६, मैदान,
१६) मिरारोड सेकटर ९, मैदान
१७) मिरारोड सेकटर १०, मैदान
१८) आरक्षण क्र १७८ मैदान
१९) नित्यानंद नगर, म्हाडा कॉम्प्लेक्स मैदान, मिरा रोड
२०) शीतल नगर, आर जी जागा, मिरा रोड
२१) एन. एच. स्कुल मैदान.
२२) काशीमीरा ए ल बी टी नाका
२३) घोडबंदर गांव बस स्टॉप
तसेच खालील मार्केट दि. २८/०३/२०२० पासून सुरु करण्यात आले आहे.
१) सचिन तेंडुलकर मैदान, नवघर , भाईंदर (पूर्व)
२) संतोष टॉकीज जवळील मैदान, भाईंदर (प.)
आज दि. २८/०३/२०२० रोजी मा. आयुक्त यांनी सुभाषचंद्र बोस मैदान, एन.एच.स्कुल मैदान व अल हजरत मैदानाची पाहणी केली.
दि. २९/०३/२०२० रोजी उत्तन पाण्याच्या टाकीजवळील मार्केट सुरु करण्यात येणार आहे.
सदरच्या भाजी मंडई या नागरिकांसाठी उद्या सकाळी १० वा. ते सायंकाळी ७ वा. पर्यंत व त्यानंतर सकाळी ८ वा. ते सायंकाळी ७ वा. पर्यंत खुले राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मोठया प्रमाणात गर्दी करु नये व तोंडावर मास्क अथवा रुमालचा वापर करावा. तसेच भाजी व आवश्यक सामान खरेदी करताना 2 व्यक्तींमधील अंतर कमीत कमी 1 मीटर ठेवावे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला पुरविण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शिस्तिने आवश्यक वस्तूंची खरेदी करावी.
तसेच Social Distancing चा वापर करावा. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी रांगेचा वापर करावा व कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता शासनाने व महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे मीरा-भाईंदर सर्व जनतेस जाहिर आवाहन मिरा भाईंदर महानगरपालिका महापौरजोस्तना हसनाळे यांच्या कडून करण्यात आले आहे.