तिहेरी हत्याकांडाने हादरला सांगली जिल्हा

 


 


 


 


 


 


तिहेरी हत्या कांडाने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून सख्या मुलानेच महाताऱ्या आई ,वाडीलासह बहिणीची संपत्तीच्या वादातून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


 


प्रत्येक व्यक्तीला वाटते की वंशाला दिवा असावा म्हातारपणाचा आधार बनवा आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करावे . या साठी हाडाची काड करून अर्धपोटी उपाशी राहून पै पै जमवून मुलांच्या हैस मौज पुरवत त्यांच्यासाठी संपत्ती बनवण्यासाठी रात्रंदिवस झिजून काबाडकष्ट करण्यात संपूर्ण हयात खर्ची घालून मुलांना लहानाची मोठे केले जाते. त्याच जमवलेल्या संपत्ती च्या वादापोटी जन्म दिलेला मुलगा जिवावर उठतो आणि आई वडीलासह बहिणीची ही हत्या करतो तेव्हा रक्ताचे नाते  किती दुरावले आहे याची प्रचिती येते आणि एका सिनेमाचं वाक्य सहज तोंडावर येत , "बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया." असाच स्वरूपाची नात्याला काळिंबा लावणारी घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात घडली आहे.


 सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी गावात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे . संपत्तीच्या लालचेपाई सख्या मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिल आणि बहिणीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आले आहे. वृद्धपकाळात आधार बनण्याऐवजी आई, वडील, बहिणीचा कर्दनकाळ घरातीलच मुलगा बनल्याने जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. जमिनीच्या वादातून हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदरील ठिकाणी पंचनामा करून पुढील कार्यवाही पोलिसांनी  सुरु केली आहे.


सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीमध्ये घडलेल्या हत्याकांडामध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या झाली  आहे.  मृतकांची नावं गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (८२), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (७५) आणि समुद्राबाई बिरादार (६२) अशी आहेत.


संशयित आरोपी सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (५८) याने वडील , आई, बहीण यांचे तिहेरी हत्याकांड  केल्याचं समोर आलं आहे.



या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून  जत पोलीस या तिहेरी हत्याकांडाचा कसून तपास सुरु केला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.