मनसे पदाधिकारी आक्रमक ,मास्क व सॅनिटायझरवरअतिरिक्त भाव वाढवला तर धडा शिकवू

मनसे पदाधिकारी आक्रमक ,मास्क व सॅनिटायझरवरअतिरिक्त भाव वाढवला तर धडा शिकवू         
            महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  पेणकर  पाड़ा परिसरातील महिला सेनेने सर्व मेडीकल दुकानदारांना फैलावर घेत
मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीवर
अतिरिक्त शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास  मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा मनसेच्या महिला सेनेने दिल्याने मेडिकल दुकानदारांनी चांगलाच धसका घेतला आहे.  
                    मीरा भाईंदर मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतिचे सावट पसरलेले असताना प्रत्येकजण
आपापल्यापरिने सुरक्षते करता काळजी घेत आहे. सध्या कोरोना मुळे बाजारात मास्कला मोठी मागणी आहे.  यामुळे बऱ्याच ठिकाणी मास्कचा साठा संपुष्टात आला आहे .याचा ग़ैरफ़ायदा घेऊन काही दुकानदार मास्कचा साठा  करून त्याची बाजारात मागणी वाढल्यावर दुपट्ट किमतीने विक्री करतात .या सर्वांची माहिती काढून सर्वांना मनसे स्टईलने समन्स देण्यात आला मात्र नुसते पत्र देऊन थांबायचं नाही "मनसे म्हणजे खळ खट्याळ" अशी मनसेचि नेहमीच भूमिका असल्याने पेणकर पाड़ा परिसरात मनविसे विभाग अध्यक्षांची आक्रमक भूमिका पाहण्यास मिळाली.10 रुपयांची वस्तू 60 रुपयांना विकणाऱ्या समाज कंठकाना मनसे मार्फ़त समन्स देण्यात आला असून आक्रमक महिलांनी  पुन्हा चुकी झाल्यास  हात पाय गळ्यात घालण्याचा इशारा दिला आहे.यावेळी मनसेच्या सोनिया फर्नांडिस ,निलक्षी म्हात्रे, करन कांडानगिरे,रोनक जोशी, संदीप पाल, मोहणिष सिन्हा, विष्णु तुपसुंदर, कुणाल मेस्त्री, कौशिक बत्रा, रुपेश म्हात्रे. प्रशांत पाटील,आशिष देशपांडे तसेच विभागातील इतर मनसैनिक उपस्थित होते.