पुणे :कोरोना विषाणू ने जगभर सगळ्याचीं चिंता वाढवलेली आहे. शास्त्रज्ञांना देखील या वरती उपयुक्त औषध तयार करण्यात यश आले नाही . त्यामुळे सावधानी हाच एकमेव उपाय आहे. भारतात याचा परिणाम सुरू झाला आहे . त्याच बरोबर महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रूग्ण पुण्यात आढळला आहे. दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या दोनही जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच पुण्यातील नायडू रूग्णालयात यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नायडू रूग्णालयात विलिगीकरण कक्षात यांना ठेवण्यात आलं आहे. दोन्ही जणांनी दुबईला प्रवास केल्याचं सांगण्यात येत आहे. दुबईहून आल्यानंतर हे रूग्ण कुणा-कुणाच्या संपर्कात आले होते, त्यांचा शोध घेतला जात आहे. हे एकूण 40 जण दुबईला गेले होते, 1 तारखेला हे पुण्यात परतले आहेत, या 40 जणांचा शोध घेतला जात असून, हे कुणा कुणाच्या संपर्कात आले आणि यांची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे. या दोन्ही जणांनी दुबईला प्रवास केल्याचं सांगण्यात येत आहे.यामुळे या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन, त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची तपासणी केली जाणार आहे. ज्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबवण्यात मदत होणार आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुगणाच्या उपचारासाठी वेगळे विलगीकरन करण कक्ष स्थापन केले असले तरीही प्रत्येकाने आपापल्या घरी काळजी घेणे गरजेचे आहे . सर्वानीं दक्षता घ्यावी आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुवून सतर्गता बाळगावी असे आव्हान करण्यात येत आहे.