नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन

 


 


नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघननवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे उल्लंघन



भाईंदर-संपूर्ण देशात १४ एप्रिल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संचारबंदी घोषित केली असतानाही मिरा-भाईंदर शहरात मात्र त्याचे सर्रास उल्लंघन करण्याचे प्रकार सुरू आहेत. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना  देऊन ही पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही त्यामुळे स्थानिकात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


 भाईंदर पूर्व नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामदेव पार्क परिसरात धार्मिकता, श्रद्धा, पूजा, अर्चा,च्या नावाखाली काहि जणांनी धार्मिक विधी करीता लोकांचा जथा एकत्र करीत मागील काही दिवसापासून एका लग्नाच्या मंगल कार्यालयात होम हवनच्या नावाखाली दररोज काही लोक एकत्र येऊन रात्रीला कार्यक्रम चालतो व परिसरात धुरच-धुर दिसत आहे व आजूबाजुच्या लोकांनि या बाबतीत मात्र आश्चर्य व्यक्त केले आहे की देशात सध्या लॉकडाऊन असताना व संचारबंदी असतानाही दररोज १५ ते २० माणसे मिळून कार्यक्रम करत असतात महत्त्वाचे म्हणजे याची स्थानिक पोलीस निरीक्षकांना माहीत असतानाही हा पराक्रम चालू आहे.



कोरोनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव सरकारने रोखण्यासाठी केंद सरकारकडून १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असताना. देशासह महाराष्ट्रात आणि मीरा-भाईंदर शहरात देखील काही व्यक्ती संचार बंदीचे उल्लंघन करत, एकत्र येत होम हवन चालू आहे. त्यामुळे अनेक लोक घरात बसने पसंद करू लागल्याने  लोकांमध्ये जागृती आली आहे मात्र काहीजण पोलिसाचे अभय घेऊन विधी कार्य करताना दिसत आहेत मात्र त्या कार्यक्रमावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.


लता देशमुख, स्थानिक रहिवासी- 
आजूबाजूंच्या परिसरातील काही लोकांनी ठाणे ग्रामीण पोलिसांना माहिती देऊनही त्यावर कारवाई करण्यास पोलीस प्रतिसाद देत नाही यावरून पोलिसांचे किती लाघे-बांधे आहेत हे यावरून दिसून येते.


शशिकांत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी-
सदरील कार्यक्रम हा लोक सामाजिक अंतर सोडून करीत असल्याचे नवघर पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे व धार्मिक विधी असल्याने जाऊन प्रत्यक्ष हा प्रकार तपासला आहे.