काशीमीरा विभागात संचारबंदी आदेशाची होत आहे पायमल्ली 


 


 
 


काशी मीरा विभागात संचारबंदी आदेशाची होत आहे पायमल्ली 


 



 कोरोना साथीच्या वाढत्या वादळाला रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांनी आज आठ वाजता केलेल्या भाषणात १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे.संचारबंदी  लागू केली आहे . या संचारबंदीचे मीरा रोड पूर्व काशी मीरा विभागात, काशी गाव, मांडवी पाडा, गावठण महाजन वाडी परिसरात किराणा दुकान दारांकडून आणि नागरिकांकडून सर्रास संचारबंदीच्या आदेशाची मात्र पायमल्ली होतांना दिसत आहेत. 


संपूर्ण देशात हहंकार उडालेला असतांना संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे.
 कोरोनाच्या विषाणू संसर्ग रोखता यावा म्हणून , सरकारने देशभरात जनता कर्फ्यु लागू करण्यात आली होता, यात डॉकटर,कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचे आभार मानण्यासाठी सायंकाळी ५ वाजता थाळी,घंटा,टाळ्या वाजवून घरातील बाल्कनी घरासमोर उभे राहून वाजवायचे होते.परंतु जनतेने तसे न करता एकत्र घोळक्यात जमून चौकाचौकात जमाव करून बँड वाजवले आणि एकच गर्दी केली आणि चुकीच्या पद्धतीने आभार व्यक्त केले.यामुळे शासनाच्या या निर्णयाला जनतेने गांभीर्याने घेतलेले दिसले नाही. 


 देशाचे पंतप्रधान यांनी १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे .यामध्ये फक्त जिनावश्यक वस्तू व आरोग्य विषयक सेवा व्यतिरिक्त सर्व बंद ठेवण्यात येईलअसा निर्णय घेतला आहे.


संचारबंदीचे गांभिर्य नाही


या पूर्वीराज्यभरात १४४ कलम मार्च ३१ तारखे पर्यंत लागू करण्यात आले होते. यात ५ पेक्षा जास्त लोक आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.सर्व शहरात संचारबंदी सक्तीची करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन कडक कारवाई करत आहे.सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.परंतु काशीमीरा विभागात काशी गावं येथे नगरसेवक सचिन म्हात्रे यांच्या कार्यालया जवळच असलेल्या किराणा दुकाने, मीरा गावठण, मांडवी पाडा , डाचकूल पाडा या ठिकानची दुकाने हे संचारबंदीची पायमल्ली करताना दिसत आहेत. यात जनता ही या संचारबंदी ला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसून आले आहे.शहरात लोक एकत्र दिसून आले आहे.


नागरिकांची विक्रेत्यांकडून लूट


संचारबंदी चा फायदा घेत अनेक किराणा दुकानात नागरिकांची लूट सुरुआहे आवाच्या सव्वा भावाने समान विकले जात आहे. तर बरेच भाजीपाला विक्रेते चढ्या भावाने भाजीपाला विकत आहेत. नागरिकांना पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिक खरेदी करताना दिसत आहेत यामुळे नागरिकांची सर्रास लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.


ठिक ठिकाणी गर्दी


काही ठिकाणी भाजीपाला विक्रेते किराणा दुकानात लोक एकत्र गर्दी करीत आहे जर असेच असलेतर संचारबंदी चा काय उपयोग असा प्रश्न पडतो आहे.  कोरोना साथीला थांबण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याची गरज आहे आहे.