समता सैनिक दलाचा शिपाई करतोय लोकांना मदत

 


समता सैनिक दलाचा शिपाई करतोय लोकांना मदत


भाईंदर पश्चिम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येणाऱ्या जाणाऱ्या आणि कर्तव्यावर असलेल्या नागरिकांची कर्मचाऱ्यांची सेवा चहापाणी करण्याचे काम समता सैनिक दलाचा सैनिक सुधीर पवार हे गेल्या संचारबंदी च्या काळापासून सेवा करताना दिसत आहेत.


कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगाला जेरीस आणले आहे . भारतातही या रोगाचे वाढते संक्रमण हे चिंता वाढवणारे ठरत आहे. संपूर्ण देशात संचारबंदी ने एक आठवडा उलटला आहे. लोकांच्या मनात भीती दिवसंदिवस वाढत जात आहे. अनेक संस्था ,एनजीओ, सामाजिक मंडळे मदतीचा हात घेऊन गोरगरिबांच्या जीवासाठी दिवस-रात्र धडपडताना दिसत आहेत. त्याच धर्तीवर मीरा-भाईंदर मधील बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून समता सैनिक दल ही शाखा कार्यरत आसते , त्या शाखेचे समता सैनिक दल जनतेच्या सुरक्षेसाठी लोकांच्या मदतीसाठी बाहेर पडताना दिसत आहेत. भाईंदर पश्चिमेतील समता सैनिक दलाचे जवान  सुधीर पवार हे या महामारीच्या साथीच्या काळात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात समता सैनिक दलाचे जवान लोकांची सेवा करत आहे. समता सैनिक दलाच्या पोशाखात लोकांच्या मदतीला धावत आहे, या समता सैनिकाचे नाव सुधीर पवार असे असून त्यांच्याशी संपर्क करून त्यांचे मनोगत जाणले असता म्हणाले की, हीच वेळ आहे, एकमेकांना मदत करण्याची मानवता जपण्याची, माणुसकी धर्म पाळण्याची.  त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कळकळीची विनंती करताना म्हणाले  की नागरिकांनी  बिना कामाचे बाहेर पडणे टाळावे एकमेकाच्या संपर्कात आल्याने हा आजार आणखी बळावतो नागरिकांनी गर्दीला आळा बसवावा तरच या संकटाचा आपण सामना करू शकतो अशी प्रतिक्रिया पोलिस मदत पत्र सी बोलताना सुधीर पवार यांनी दिली.