राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय ७ दिवस सरकारी कार्यलय  बंद

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय ७ दिवस सरकारी कार्यलय  बंद 


 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून सर्व शासकीय कार्यालये ७ दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद असली तरी अत्यावश्यक सुविधा असलेली कार्यालये सुरु राहतील.


देशात सर्वाधिक कोरोनाचे संशयित महाराष्ट्र मध्ये आढळून आले आहेत. हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारने आज अत्यावश्यक सेवा सोडून राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं ७ दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद असली तरी अत्यावश्यक सुविधा असलेली कार्यालये सुरु राहतील. जी कार्यालयं कोरोनाच्या संदर्भात प्रत्यक्ष काम करत आहेत ती सर्व कार्यालयं सुरु राहणार असल्याची देखील माहिती आहे.


सरकारी कार्यालये बंद असली तरी  सरकारी कर्मचारी परवानगीशिवाय शहराच्या बाहेर जाणार नाहीत. त्यांची गरज कधीही लागू शकते.  शहर सोडून जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.


राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसंच तहसीलदार कार्यालय तसंच विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे मुंबईतची लाईफ लाईन लोकल देखील टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार शासन करत आहे. या पूर्वी शाळा , कॉलेज, व्यायाम शाळा, तरण तलाव यांना ३१ तारखे पर्येंत बंद ठेवण्याचे आदेश या पूर्वीच सरकारने दिले आहेत . कोरोनाचा प्रसार रोखता यावा म्हणून आता सरकारने  हा मोठा निर्णय घेतला आहे.


त्याच बरोबर 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ लांब पाल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
दरम्यान, सगळ्या खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. तसंच येणाऱ्या काही दिवसांत अनावश्य गर्दी टाळण्यासाठी लोकांनी देखील अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे