आमदार रत्नाकर गुट्टे ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या संगनमताने व  शुगर अँड एनर्जी लिमिटेड  कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन व्यवस्थापकावर  दोन ऊसतोड मुकादम यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदार रत्नाकर गुट्टे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना रविवार पर्येंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 



लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेला लोकांचा लोकप्रतिनिधी जेव्हा लोकांची फसवणूक करायला सुरुवात करतो तेव्हा अशा प्रतिनिधी वरती विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न मतदारसंघातील नागरिकांना पडला आहे. गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याला ऊसतोड मजुरांचा पुरवठा व ऊस वाहतुकीचा करार करण्यासाठी अंबाजोगाई येथील दोन मुकादमांनी आपली महत्वाची कागदपत्रे साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळाकडे देण्यात आली होती.


साखर कारखाने ऊसतोडणी साठी व ऊस वाहतुकी साठी मुकादम  यांच्याशी करार करते ऊसतोड मजूर आणि तो तोडलेला ऊस कारखान्यापर्येंत पोहचवणे त्या मुकदमाचे  काम असते . २०१६ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी गंगाखेड येथील शुगर अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्या सोबत करार करण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळे या गावचे दोन ऊसतोड मुकादम म्हणून काम करणारे , रावण पांडुरंग केंद्रे व प्रभाकर गुलाब केंद्रे या दोन व्यक्तींनी ऊसतोड मजूर पुरवठा व ऊस वाहतूक करार करण्यासाठी  साखर कारखान्याची संपर्क केला . कारखान्यांनी  मागणी केल्यानुसार  सर्व महत्त्वाची कागदपत्रे बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेत कोऱ्या धनादेशासह महत्त्वाचे कागदपत्रे जमा करण्यास सांगितले त्या प्रमाणे कागदपत्रे जमा केली . याच काळात दुसऱ्या कारखान्याकडून चांगला मोबदला मिळत असल्याने या दोन्ही मुकादमांनी कर्नाटक येथील सदाशिव कारखान्यासोबत करार केला. त्यामुळे गंगाखेड येथील कारखाण्यासोबत कोणताही करार केला नाही ना त्यांना मजूर किंवा कोणतेही वाहन पुरवठा केला नाही . उलट त्यानी जमा केलेले महत्त्वाचे कागतपत्रे परत मागितले. वारंवार विनंती करुनही त्यांची कागतपत्रे परत करण्यात आले नाही. कारखान्याच्या कामात गुंतल्यामुळे दोघांनीही पाठपुरावा करण्यात हायगय केली.  त्यामुळे कागतपत्रे तशीच कारखान्याकडे राहिली.  2015 च्या जुलै महिन्यात आमदार रत्नाकर गुट्टे, कारखान्याचा कार्यकारी संचालक यांनी बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखा व्यवस्थापक यांच्यासोबत संगनमत करून दोन्ही मुकादमांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून प्रत्येकी १२ लाख ८०  हजार रुपये एवढे कर्ज काढले दोघांच्या नावे ऐकून २५ लाख ६० हजार रुपये कर्ज काढून त्याची विल्हेवाट लावली . बँकेने कोणत्याही प्रकारची माहिती या व्यवहारासंदर्भात मुकादमांना दिली नाही असे त्यानी तक्रारीत म्हटले आहे.  जेव्हा २०१८ ला कर्ज खाते थकीत झाल्याने या मुकादमांना नोटिसा आल्या तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. 
कारखान्यासोबत करार करण्यासाठी कारखान्याने मुकादमां कडून बँक खात्याचे कोरे चेक , कोरे बॉण्ड, ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या आरसी बुकाच्या प्रति , इन्शुरन्सच्या प्रति, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पास बुक प्रत , शेतीचा सात बारा व नमुना आठ अ च्या प्रति, स्वाक्षरी पडताळणी अर्ज, फोटो या सह काही कोरे अर्ज घेतले होते . त्याच आधारे बँकेत बनावट खाते उघडून त्यातून रक्कम काढण्यात  आली. याची कोणतीही भनक या मुकादमांना लागू दिली नाही असे या मुकादमाकडून सांगण्यात येत आहे.