तोडक कारवाई करण्यास गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक
काशीमीरा येथील प्रभाग क्र. 14 मधील मांडावीपाडा येथे महापौरांच्या प्रभागात घर व कार्यालयापासून 100 मिटर वर सुरू असलेले बांधकाम तोडण्यास गेलेल्या मनपा अतिक्रमण पथकावर केली दगड फेक.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या आदेशा नुसार मनपा प्रभाग समिती क्रमांक 6 मध्ये काशीमीरा विभागात तोडक कारवाई करण्यात येत होती ही कारवाई नुकत्याच महापौर झालेल्या जोस्तना हसनाळे यांच्या घरा जवळ व कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या अवैध बांंंधकामावर होती. ग्रीनविलेज नाका, वेस्टर्न बेकरी च्या पाठीमागे सर्व्हे क्रमांक हिस्सा क्रमांक 24/18 , 25/5 , 86/5अ 5ब या जागेत चाळ माफिया भू माफिया मनोज चौहान नावाच्या व्यक्ती कडून अवैधपणे चाळी बनवण्याचे काम सुरू होते . सर्व्हे क्रमांक ८७/४ येथे गोविंद विश्वकर्मा आणि बबलू पांडे यांनी बांधलेल्या २० पक्क्या रूम तोडल्या या रूम तोडल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सर्व्हे क्रमांक २४/२५ येथील अनधिकृत बांधकामांकडे वळवला. मांडवी पाडा या परिसरात मनोज चौहान कडून आता पर्येंत जवळपास 200 पेक्षा अधिक पक्क्या रूम बनवण्यात आल्या आहेत अशी स्थानिकांकडून माहिती मिळते आहे . या पैकी 40 रूम वर बोगस कागदपत्रा द्वारे न्यायालयाकडून स्थगिती आदेश घेतला गेला आहे अशीही माहिती स्थनिक रहिवाश्यांकडून मिळते आहे. या चाळ माफियाचे सदरील जागेत चाळीचे बांधकाम सुरू होते ते अवैध बांधकाम तोडण्यासाठी प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे यांनी अतिक्रमण पथकातले कर्मचारी ,जेसबी मशीन व पोलीस संरक्षण घेऊन गेले असता येथे दबाधरून बसलेल्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून या तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकावर तुफान दगडफेक करण्यात आली ही दगड फेक सुरू झाल्यानंतर एकच तारांबळ उडाली दगड रस्त्यांच्या दिशेने फेकले जात होते. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना लोकांना पोलिसांनी वेळीच रोखले रस्त्यावर कोणाला जाऊ दिले नाही म्हनुण अनर्थ टळला . फक्त जेसबी मशीनच्या काचा फोडून मशीन नुकशान केले गेले असेही बोलले जात आहे. या चाळ माफियांना स्थानिक नगरसेवकांचा पाठींबा आहे त्यामुळेच या अवैध चाळी इथे बिनधास्तपने उभ्या केल्या जात आहेत . नगरसेविका मिरदेवी यादव, नगरसेवक सचिन म्हात्रे आणि सध्याच्या महापौर जोस्तना हसनाळे यांचे आशीर्वाद या चाळ माफियांना आहेत. म्हणूनच एवढ्या मोठ्याप्रमाणात चाळी उभ्या होत आहेत असे स्थानिक नागरिकांत चर्चा ऐकायला मिळते आहे. या अवैध चाळ माफिया कडून अर्थ नगरसेवकांच्या पर्येंत पोहचल्या शिवाय हे एवढे अवैध बांधकाम ,या चाळीच्या चाळी कश्या काय बनू शकतात असा प्रश्न स्थानिक राहिवाशी करतांना दिसत आहेत .
या घडलेल्या प्रकारा नंतर मीरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे म्हणाले की, हा घडलेला प्रकार निंदनीय
आहे असे वर्तन करणाऱ्या भू माफिया असो या चाळ माफिया यांना कदापिही सोडले जाणार नाही व त्या अवैध बांधकामावर जास्त प्रमाणात पोलीस बंदोबस्त घेऊन तोडक कारवाई करण्यात येईल आणि अवैध बांधकाम जमीनदोस्त केले जाईल. या दगडफेेेक करणाऱ्या विरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत चोकशी करीता काही जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
गुंडागर्दी करून कायद्याला कचरा व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या खिशात घेऊन फिरतो म्हणनारा चाळ माफिया, भू माफियावर विज चोरीचा गुन्हा व अनेक एमआरटीपी गुन्ह्यासह अनेक गुन्हे असलेला आरोपी जेव्हा अनेक गुंडाच्या मदतीने भय निर्माण करतो याचा अर्थ मात्र नेमका हाच म्हणावा लागेल की स्थानिक राजकारणी अर्थलाभापोटी ही परिसरात पसरलेली गुंडागर्दी वाढवण्यास कारणीभूत आहेत की काय असा प्रश्न शहर वाशियाकडून उपस्थित केला जात आहे.