मोफत मास्क व सॅनिटायझर देण्याची महापौरांची आयुक्तांकडे मागणी

महापौर जोस्तना हसनाळे यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता खबरदारी म्हणून महानगरपालिके कडून शहरातील नागरिकांना मोफत मास्क आणि सॅनिटायझर देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. 


देशातील कोरोनाची लागण होत असलेली संख्या वाढत आहे. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रमाण सर्वात गतीने वाढत आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना पालिकेतर्फे  मास्क व सॅनिटायझर मोफत वाटप करण्यात यावे अशी मागणी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.


मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  कोरोनाच्या साथी पासून बचाव करण्यासाठी नागरिकांची होणारी हेळसांड पाहता महानगर पालिकेच्या माध्यमातून होऊ नये याची काळजी  सॅनिटायझरचे व मास्क चे घरोघरी जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्या नुसार वितरित करणे गरजेचे आहे. 


राज्यातील परिस्थिती पाहता दिवसंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याची काळजी घेणे गरजेचेआहे. येणाऱ्या प्रत्येक परिस्थिती चा सामना करावा लागनार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मास्कचे मोफत वाटप करण्यासाठी मास्क व सेनिटाइजर विकत घेण्यास लागणारा निधी चालू आर्थिक वर्षात त्याची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांनी त्याचा वापर केल्यामुळे कोरोनाच्या विषाणूपासून दूर राहण्यास मदत होईल असेही म्हटले आहे.