कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालयास दिला आमदार गीता जैन यांनी आमदार निधी.

 


 


 


कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालयास दिला आमदार गीता जैन यांनी आमदार निधी.


पोलीस मदत पत्र बातमी :-(मिरारोड)


कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालय अत्याधुनिक करण्यासाठी  गीता जैन यांच्या पुढाकाराने आमदार निधी च्या माध्यमातून येणार आयसीयू आणि व्हेंटिलेटर.


मिरा-भाईंदर - देशात कोरिणाचा वाढता हाहाकार पाहता या साथीला रोखण्यासाठी सरकाने जोरदारपणे सर्वच स्थरातून प्रयत्न केले सुरू आहेत. संपूर्ण जगाला हतबल करणाऱ्या या रोगाचे संक्रमण असेच वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येऊ शकतो हे पाहून राज्य सरकार विविध आव्हान आणि उपाययोजना करीत आहे. 


कोरोना साथीला हरवण्यासाठी मिरा-भाईंदर मनपा प्रशासन जोरदार तयारी करत आहे. तर आता या शहराच्या आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीतून ३० लाख रुपये  पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सुविधा तयार करण्यासाठी दिले आहेत.


काय वाटत गीता जैन यांना


 शहरातले एकमेव रुग्णालय पंडित भीमसेन जोशी हे अत्याधुनिक करावं ही माझी प्राथमिकता आहे. जनतेने मला त्यांची काम करण्यासाठी निवडून दिलं आहे, जर मी हा निधी या रुग्णालयात आयसीयू बनवनण्यासाठी वापरते आहे तर त्यात फार काही मोठं नाही,  हा जनतेचाच टॅक्स चा पैसा आहे. आणि आज त्यांच्या सुविधांसाठी वापरात आहे . जनतेला याचा फायदा नक्की होईल अशी अपेक्षा आहे. आज पर्यंत पूर्णपणे वापरला गेला की नाही यावर शंका उपस्थित राहते असे म्हणत माजी आमदाराणा टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांचे  आभार मानताना म्हणाल्या की, उद्धवजीनीं अधिवेशनात घोषणा केली होती कि यंदाच्या वर्षापासून आमदार निधी हा २ करोड पेक्षा वाढवून प्रति वर्षी ३ करोड केला आहे. 
मी महापौर असतानाच राज्य शासन आणि महानगरपालिका यांनी भीमसेन जोशी रुग्णालयाची नवीन इमारत उद्घाटीत केली होती. त्यानंतर मात्र रुग्णालयाच्या सेवेमध्ये म्हणावी तशी आधुनिकता  आलेली दिसत नाही. मिरा भाईंदर शहरातील वाढती लोकसंख्या पाहता लोकांचे आरोग्य समस्या निवारण्यासाठी सरकारी आणखी हॉस्पिटल हवे आहेत १४-१५ लाख लोकांना खरतर एकच सरकारी रुग्णालय हे अपूर आहे तरी मी राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी आणून या रुग्णालयास अत्याधुनिक सिव्हिल हॉस्पिटल बनवण्यास प्रथम प्राधान्य देणार  आहे तस माझं मिरा-भाईंदर कराना वचन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेलं ५० लाख रुपयांचा निधी हा या ३० लाखांहून अधिक असतील आणि तेही कोरोना साथीला रोखण्यासाठी  वापरण्यात येईल असेही यावेळी गीता जैन यांनी सांगितले.