जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला पोलिस अधिकाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विरार मध्ये पालघर गुन्हे शाखेच्या वसई युनिट च्या प्रभारी एपीआय सिद्धवा जायभाय यांच्यावर दोनअज्ञात इसमाने मुंबई अहमदाबाद हायवेवर गोळीबार केला आहे त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.


आज दिनांक 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा केला जात असतांनाच पालघर जिल्ह्यातील गुन्हेशाखा वसई युनिट च्या प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असलेल्या सिद्धवा जायभाय या महिला पोलीस अधिकाऱ्यावर मुंबई अहमदाबाद हायवेवर असलेल्या नॉवेल्टी हॉटेल समोर 8:30 सायंकाळी वाजण्याच्या सुमारास बाईक वरून आलेल्या दोनअज्ञात इसमाने दोन गोळ्या झाडल्या आणि आरोपी पसार झालेआहेत. नालासोपारा कार्यलयातुन आपले काम संपवून आपल्या सहकाऱ्यासोबत त्यांच्या खाजगी स्वीप्ट गाडीतून पालघरला घरी जात असताना त्या बर्गर घेण्यासाठी या हॉटेल ठिकाणी थांबले असतांना काळ्या रंगाच्या  पल्सर नावाच्या दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञातहल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी जायभाय यांच्या दिशेने गोळीबार केला पण त्या गोळ्या गाडीच्या समोरील बोनेट वर लागल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अज्ञात हल्लेखोरां विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. महिला पोलिस अधिकाऱ्यांवर गोळीबार झाल्याची खबर मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावघेतली . ज्या कारवर गोळीबार झाला ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून पंचनामा केला आहे. गोळीबार का केला गेला याचे कारण अद्याप कळालेले नसून आरोपी पकडले गेल्यानंतरच कारण स्पष्ट होईल अशी माहिती मिळते आहे.  या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही हल्लेखोरानी झाडलेली गोळी गाडीच्या बोनेटवर लागली त्यामुळे जायभाय हया सुदैवाने बचावल्या आहेत.