मुंबई उपनगराला लागूनच असलेल्या मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे वाढत्या लोकसंख्येबरोबर दुचाकी ,चारचाकी व इतर अवजड वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे .लाखोंच्या घरात वाहने असलेल्या या शहराला आरटीओ कार्यालयाची गरज उपकेंद्र च्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे एक मे पासून मीरा-भाईंदर शहरांमध्ये चालू होणार आहे असे आदेश परिवहन विभागाला परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मीरा भाईंदर शहर हे झपाट्याने विकसित होणारे शहर आहे.शहराची लोकसंख्या जवळपास१२ लाखाच्या घरात गेलेली आहे शहरात न्यायालय, तहसील, सेतू, पोलिस उपविभागीय कार्यालय सहित अनेक कार्यालये आहेत. त्याचबरोबर वाहांनाची संख्याही लक्षणीय असल्याने इथे आरटीओ केंद्राची गरज भासत होती ती आता पूर्ण होणार आहे .आरटीओ संबंधित कामासाठी वाहन धारकांना ठाणे येथे जावे लागत होते भाईंदर ते ठाणे असा प्रवास जवळपास २५ किलोमीटरचा आहे तो आता टाळता येणार आहे. लर्निंग लायसन पासून ते पक्के लायसन घेण्यापर्यंत तर वाहनांच्या संदर्भातील आरटीओ विभागातुन लागणारी वेगवेगळी कागदपत्रे घेण्यासाठी ठाणे येथे जावे लागत असे त्यात वेळ,पैसा, ट्राफिक याचा त्रास सहन करावा लागत असे. वेळेत पोहचता आले नाही तर हेलपाटे मारावे लागत असत. या शहरातून दररोज आरटीओ च्या वेगवेगळ्या कामासाठी जवळपास चारशे ते पाचशे लोकांना ठाण्याला जावे लागते. आता शहरवाशीयांची होणारी दगदग थांबणार आहे. रेल्वे स्टेशनच्या लगत असलेल्या एसटी महामंडळाच्या जागेवर आरटीओचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. आरटीओ उपकेंद्राच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्यामुळे हे कार्यालय कंटेनर केबिन मध्ये सध्या सुरू होणार आहे. या उपकेंद्रासाठी सध्या सहा अधिकारी व कर्मचारी यांच्यासह लागणारी इतर सामुग्री साठा देण्याचे नुकत्याच परीवहन मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच हे आरटीओचे उपकेंद्र सुरू होणार आहे. या उपकेंद्राचे उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते १ मे रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.