महापौरांचे गर्दी कमी व्हावी याची उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांना पत्र
मीरारोड : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने मीरा-भाईंदर शहरात सुरू करण्यात आलेल्या तात्पुरती भाजीपाला दुकानात गर्दी केली जात असून तिथे उपाययोजना करण्यात यावी व तिथे एक पोलिस कर्मचारी ठेवण्यात यावा अशी मागणी महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका कर्तव्यदक्ष आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी कोरोना रोगाच्या वाढता प्रभाव लक्षात घेता, देशांमध्ये सुरुअसलेली संचारबंदी लोकांना उपलब्ध होत नसलेला भाजीपाला, त्यासाठी होणारी एकच गर्दी , यामुळे शहरात वेगळा परिणाम होऊ शकतो याची काळजी घेत. शहरात अनेक ठिकाणी खुल्या मैदानात भाजीपाला दुकाने सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी एक मीटर पेक्षा अधिकअंतरावर एक मेकापासून दुरी ठेवावी आणि भाजीपाला खरेदी केला जाव असे वारंवार सांगितले जात आहे. तसे चौकोन मारून देण्यात आली आहेत तरीही शहरातल्या नागरिकांची जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी झुंबड उडू लागली हे लक्षात घेता योग्य पद्धतीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी विनंती महापौरांनी केली आहे.
मीरा-भाईंदरमहानगरपालिकेकडू शहरवासीयांना भाजीपाला मिळत नसल्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात याची कल्पना आयुक्त महोदयांना जाणवली आणि त्यांनी तात्काळ शहरांमध्ये तात्पुरते भाजीपाल्याचे दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेऊन तसे आदेश देण्यात आले आहेत बऱ्याच ठिकाणी दुकाने सुरू झाले आहेत.
मात्र या शहरातल्या नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी भाजीपाल्याची अनेक परिसरात दुकाने सुरू झाल्यानंतर महापौरांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन शहरात अधिक भाजीपाला दुकाने भरवण्यात आली आहेत. त्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. पोलिस बंदोबस्त ठेवावा जेणेकरून गर्दी होणार नाही. नगरसेवकांच्या अनेक तक्रारी महापौरांकडे आल्या आहेत असे महापौरांचे म्हणणे आहे.
शहरातल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रशासन नागरिकांना सर्वोत्तपरी सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.
पण शहरात अनेक ठिकाणी भाजीपाला विक्रीचे दुकाने सुरू झाली आहेत. त्यादुकानात नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. शिस्त ठेवण्यात येत नाही त्यामुळे कोरोनाच्या साथीचा परिणाम या गर्दीत होऊ शकतो . या गर्दीला थांबण्यासाठी प्रत्येक भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात यावी आणि एक पोलिस कर्मचारी त्या ठिकाणी नेमून सुरक्षित अंतर ठेवून त्या ठिकाणी भाजीपाला विक्री व्हावी या दृष्टीने नियोजन केले जावे. जर असे नियोजन केले गेले नाही आणि दुर्दैवाने काही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल. याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.