शहरातील जीवन आवश्यक वस्तू व्यतिरिक्त तीन दिवस बाजारपेठ  बंद 

शहरातील जीवन आवश्यक वस्तू व्यतिरिक्त तीन दिवस बाजारपेठ  बंद 


मीरा-भाईंदर शहरातील बाजारपेठ तीन दिवस बंद करण्यात आल्याने व्यापारी वर्गाची एकच धांदल उडाली असून खबरदारी म्हणून घेतला निर्णय. जीवन आवश्यक वस्तूची दुकाने सुरू राहणार आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.


 


        कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मीरा भाईंदर मनपा आयुक्तांनी नवीन आदेश काढून शहरातील  सर्व बाजारपेठ शुक्रवारी काल सायंकाळी ५ वाजल्या पासून सलग तीन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा व्यापारी वर्गात एकच धांदल उडाली असल्यामुळे व्यापारी वर्गात नाराजगी व्यक्त केली आहे. तर मानवीजीवन सुरक्षित राहावे या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मिळते आहे.  नागरिकांनी सहकार्य करावे गर्दीत जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिवन आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असल्याचे सांगितल्या जाता आहे. भाजीपाल्याचा  तुटवडा होण्याची शक्यता ही काही जणांना वाटते आहे . 
           महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.मिरा-भाईंदर शहरात  दाट लोकसंख्या असल्याने विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी व  कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शहरात जास्त वर्दळ असणाऱ्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे .शहरातील महापालिकेचे उद्यान ,मैदान ,चित्रपट गृह ,मॉल ,खेळाची मैदाने, तरण तलाव ,त्याचप्रमाणे रस्त्यावरील  फेरीवाले ना फेरीवाले  क्षेत्रातील हात गाड्या ,खाद्यपदार्थ  ,सरबत आदी पेय  विक्रीच्या हातगाड्या ,टपऱ्या तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . तसेच महापालिकेच्या  हद्दीतील रुग्णालय, दूध डेरी ,मेडिकल स्टोअर्स ,कॉल सेंटर, डायग्नोजिक सेंटर , जीवन आवश्यक वस्तूची दुकाने या गोष्टी वगळून सर्व दुकाने आज सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद  ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे . शहरातील आस्थापना बंद ठेवण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व पालिका आयुक्त,अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तीन दिवस बाजार बंद असल्यामुळे घरात दररोज लागणाऱ्या वस्तूचा तुटवडा जाणवु शकतो यामुळे लोकांनी आजच बाजारातून भाजीपाला विकत घ्यावा, असे  आयुक्तांकडून  सांगण्यात आले आहे.जास्त गर्दीच्या ठिकाणी करोना विषाणूंचा प्रादुर्भाव लवकर  होऊ शकतो म्हणून हा खबरदारीचा उपाय म्हणूननिर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.