शहरातील पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा, डान्सबार ३१ तारखे पर्येंत बंद :- पोलिस मदत पत्र

शहरातील पब, डिस्को, ऑर्केस्ट्रा, डान्सबार ३१ तारखे पर्येंत बंद
.


दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत, तर संशयित रुग्णांच्या संख्येतही वाढ होतांना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी खबरदारी घेण्यास सरुवात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून नागरिकांची एकाठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याचे सांगितलं आहे.


कोरोणावर अद्याप औषध सापडलेल नाही या रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी सावध राहणे आणि काळजी घेणे हाच एक पर्याय आहे. काही कंपन्यांनी तर कामगारांना व ऑफिसेसने वर्क फ्रॉम होम कल्चर वापरले आहेत. तर शाळांना आणि महाविद्यालयांना शासनाकडून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच मॉलस,तरण तलाव , सिनेमा गृहे, स्टेडियम , गार्डन, इत्यादी सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात कमी येणं आणि स्वछता राखणं हाच पर्याय आहे आणि म्हणून याची दक्षता आता पोलिस विभागाने सुद्धा घेतली आहे.