देशात आणि महाराष्ट्रात वाढला कोरोना बाधितांचा आकडा. काळजी घ्या , सावध रहा, घर सोडू नका,बाहेरून कोरोना घरात आणू नका

देशात आणि महाराष्ट्रात वाढला कोरोना बाधितांचा आकडा


देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण हे चिंता वाढवणारे आहे. आजच्या स्थितीत ही संख्या वाढत जात आहे सध्या महाराष्ट्र राज्य १७७ तर देशात ८७३ संख्या कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. देशात कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालया कडून मिळते आहे.


अतिप्रगत असलेल्या अमेरिकेसारख्या देशाला कोरोनाच्या साथीने हवालदिल केले आहे. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस फोफावत आहे . भारतामध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


भारतात कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. सरकार योग्यती काळजी घेत आहे. वाढते कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर या साथीच्या रोगाला आळा कसा बसेल या प्रयत्नांत आहे.
 एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कडून मिळते आहे . 


बाहेर देशातून मागच्या दोन महिन्यात अलेल्याची संख्या फार मोठी आहे. गेल्या दोन महिन्यात विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले आहेत. या सगळ्यांना देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. २४ तासात १४९ नवे रुग्ण आढळ्याने ही संख्या वाढली आहे.


तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ती राज्याची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत.


त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १५९ वर गेली होती. मात्र आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील करोनाग्रसतांची संख्या १७७ झाली आहे. आज सकाळीच मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आता १५९ झाल्याचं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलं होतं. मात्र आता ही संख्या १७७ वर जाऊन पोहचली आहे.अशी माहिती समोर येत आहे. हा वाढता आकडा पाहता जनतेने सावध राहणे गरजेचे आहे. काळजी घ्या , सावध रहा, घर सोडू नका,बाहेरून कोरोना घरात आणू नका . बिनकामाचे बाहेर फिरणे हे संकटाला घरात घेऊन येऊ शकते . म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.