मीरा-भाईंदर मध्ये कामगारांना ट्रक मध्ये लपून घेऊन जातांना ट्रक पकडले
कोरोना साथीत महामारीच्या भीतीने शहरातील मोलमजुरी करणारा कामगार गावं जवळ करण्याचा प्रयत्न करतांना देशभर दिसत आहे कुठे वाहनात लपून तर कुठे पाई पाई जातांनाच्या बातम्यां ऐकायला मिळत असतानाच मीरा-भाईंदर शहरातून कामगारांना कर्नाटक, उत्तरप्रदेश येथे ट्रक मध्ये लपवून घेऊन निघालेल्या ट्रक व चालका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना रोगाच्या महामारीची दहशत संपूर्ण जगात पसरलेली आहे. सर्व जनता भयभीत झालेली आहे, प्रत्येकजण भीतीच्या सावटाखाली जगत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांनी खेडे गावं सोडून शहराचा रस्ता धरला होता. शहरातल्या नागरीसुविधा मिळणाऱ्या पाहून तो शहरात स्थिरावला तर अनेक जण आपल्या गावाच्या मातीशी संबंध ठेवत येऊन,जाऊन काम करत राहणारा वर्ग शहरात आहे. पावसाळा गांवी राहायचे आणि हिवाळा , उन्हाळा ,शहरात येऊन काम करून कुटूंब चालवायचे अशा स्थितीत जगणारा वर्ग आज हवालदिल झालेला आहे. हातावरच पोट असलेला हा वर्ग काम केल्याशिवाय चूल कशी पेटणार या चिंतेत सतत असतो. आता सध्याच्याकाळ त्यांच्यावर भयंकर परस्थिती घेवून उलटला आहे. कुटुंब गांवी मुलं, पत्नी ,आई वडील, भाऊ बहीण ,गावी भीतीच्या छायेत तर हा इकडे भीतीने जगत आहे. देशातवाढते कोरोनाचे थैमान लागू असलेली संचारबंदी ही उपासमारीची वेळ आणते की काय ? ही भीती तर एकीकडे कोरोनामुळे मरणाची भीती या दुहेरी संकटात सापडलेल्या या कामगारांना गावं कसे जवळ करता येईल याची चिंता लागली आहे.
देशातल्या विविध राज्यातील मोलमजुरी साठी शहरात आलेले अनेक कामगार कोरोनाच्या भीतीने गांवी जाण्याचा मार्ग शोधत आहेत. कोणताही पर्याय अशो गावं जवळ करायला हा कामगार तयार आहे.
जिल्ह्याच्या सिमा बंद, राज्याची सीमाबंदी, देशात संचारबंदी असतांनाही मीरा-भाईंदरमध्ये काम करणारे कामगार मात्र इथे होत असलेली उपासमार व कोरोनाच्या भीतीने मध्यरात्री एका ट्रकमध्ये लपून कामगारांना घेऊन कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात निघाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांकडून तात्काळ पावले उचलत कारवाई करण्यात आली. मीरारोड आणि नवघर पोलीस ठाण्यात दोन ट्रक जमा करून चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस विभागाकडून शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे.