पोलिसांच्या नांवाने फेक मेसेजेस व्हायरल काय आहेत ते मॅसेज जाणून घ्या

 


पोलिसांच्या नांवाने फेक मेसेजेस व्हायरल काय आहेत ते मॅसेज जाणून घ्या


सोशल मीडियावर अनेक पोलिसांच्या नावाने फेक अफवांचे मेसेज फिरत आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई पोलिसांनी वेळा घालून दिल्या आहेत अशी पोस्ट मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज फेक असल्यानं कृपा करुन ती व्हायरल करु नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.



फेक मेसेज आहे तरी काय ?
  फेक मेसेजमध्ये अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा माल, भाजीपाला, केमिस्ट, दूधविक्रेते यांची दुकानं कधीखुली राहणार. याचा टाईम नमूद केलेला आहे. पण मुंबई पोलिसांनी अशी कोणतीही वेळ घालून दिलेली नाही तर तो मेसेज फेक आहे. 
 मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना फेक व्हायरल मेसेजपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
त्याच बरोबर हा फेक मेसेज कोणीही समाज माध्यमातून पुढे पाठवू नये असे ही सांगण्यात आले आहे.


पोलिस आयुक्तांनी केले ट्वीट


CP Mumbai Police

@CPMumbaiPolice
Namaste, I’m the Commissioner of @MumbaiPolice & this list has definitely not been made on my directions! The last thing we want to get infected with & pass on during such crisis is rumours. Pls verify every msg regarding emergency services before you forward #StaySafeFromRumours


View image on Twitter
10.5K
9:09 AM - Mar 24, 2020
Twitter Ads info and privacy
4,518 people are talking about this



मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विटरवरून हा मेसेज फेक असून मुंबईकरांना फेक मेसेज न पसरवण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, मी मुंबईचा पोलिस आयुक्त आहे. मी अशाप्रकारच्या कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत त्यामुळे या पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी खात्री करुन घ्या असं त्यांनी म्हटलं आहे