महाराष्ट्र सध्या कोरोना साथीच्या धोकादायक उंबरठ्यावर उभा आहे. राज्यावर बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारने दिलेले निर्देश काटेकोरपणे पाळा', असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आता सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य तसंच इतर आवश्यक सेवा सुरु राहील, साथ रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी नाईलाजाने संचारबंदी लागू करावी लागत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले
खासगी वाहनेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू
रिक्षा, टॅक्सी मधील प्रवाशांची संख्या मर्यादित ठेवा टॅक्सीमध्ये एक चालक आणि दोन प्रवासी तर रिक्षामध्ये एक चालक आणि एक प्रवासी असतील .
राज्याच्या सीमा बंद नंतर आता जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद
राज्यातील जनतेच्या हितासाठी काल राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत, अनेक जिल्ह्यात कोरोनाचे संशयित आढळले नाहीत त्यामुळे त्या जिल्ह्यात होणारा फैलाव रोखू शकतो.
होऊ शकते विमानतळ बंदी ?
देशांतर्गत सुरू असलेले विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. राज्यात मुंबई, नागपूर, संभाजीनगर, शिर्डी असे आंतरराष्ट्रीय विमातनतळ आहेत ती बंद करण्यासाठी आपण पंतप्रधानांना पत्रव्यवहार केला आहे असे ही मुख्यमंत्री म्हणाले.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा व दुकाने सुरू
जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील असे पशूंचे दवाखानेही उघडे राहतील, कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले