शुद्ध च्या नावाखाली अशुद्ध पाणी विकून जनतेच्या आरोग्यासी केला जातोय खेळ
एक जागरूक नागरिकाने नामांकित कंपनीचे बनावट लेबल अशुद्ध पाणी बाटलीला लावतांना केले मोबाईल मध्ये चित्रंन करून अशुद्ध पाणी बॉटल बाजारात विक्रीस तयार करणाऱ्यां दोन तरुणांचे व्हिडीओ केले समाज माध्यमावर व्हायरल.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
पाणी हेच जिवन म्हटले जाते . निसर्गाने दिलेल्या देणगीला मानवाने आपल्या स्वार्थासाठी पैसा कमावण्याचा पर्याय बनवला, त्याच पर्यायाचा काही विकृतींनी गैरवापर करत चक्क नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला आहे. याचे चित्रण आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रित केले आणि समाज माध्यमावर प्रसारित केल्यावर शहरात वाऱ्यासारखा तो व्हिडीओ व्हायरल झाला.
मिरारोड मध्ये शृष्टि परिसरात सेक्टर ३ येथे सोमवारी दुपारी १२,३० च्या दरम्यान रसत्याच्या कडेला , एका बसच्या आडोशाला टेम्पो मधुन मिनरल वॉटरच्या बाटल्या विक्रीसाठी वाहून नेणारे बाटल्यांना बनावटी लेबल लावतानाचा व्हीडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने मिनरल वॉटरच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळ करणारी टोळी शहरात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मीरा भाईंदर मध्ये पिण्याच्या पाण्याचा गोरखधंदा शहरात मोठया प्रमाणात होत आहेच ,टँकर माफियांची लॉबी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे शहरात कार्यरत आहे. बऱ्याच वेळा पाण्याची नासाडी किंवा ग़ैरवापर या सारख्या घटना घडतात.
पण एका जागरूक नागरिकाने आपल्या घराच्या बालकनीतुन मिनरल वॉटरच्या बाटल्याना रस्त्याच्या कडेला बसच्या आडोशाला बनावट लेबल लाइटरच्या साहाय्याने लावत असताना त्यानीं दोन तरुणांना पाहिले. या कृत्याचे गांभीर्य ओळखून त्या नागरिकाने आपल्या मोबाइल मध्ये त्या घटनेचे चित्रिकरण केले. त्याची क्लिप त्यांनी समाज माध्यमातून प्रसारित केल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी काय करत आहेत असा प्रश्न शहरातील नागरिकांमधून विचारला जात आहे . दिवसा ढवळ्या पाण्याची बनावट गिरी करून नकली नावाचे लेबल वापरून बिनधास्त पणे पाण्याची काळाबाजारी केली जाते . बोरिंग, नळाचे ,विहिरीचे पाणी बाटल्यात भरून नावाजलेल्या कंपनीच्या नावाचे लेबल वापरून खुलेआम विक्री करून पैसे कमावले जातात . असे गैरकृत्य करणाऱ्यां लोकांशी अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध असतात त्यामूळेच असे लोक बिनधास्त कृत्य करतात असे अनेक जाणकार बोलून दाखवत आहेत.
साध्य पसरलेले कोरोनाचे संकट आणि त्यात ही पाण्याची भेसळ करून जनतेच्या आरोग्यासी खेळणारे रॅकेट साटेलोटे बनवून गप्प असलेले अधिकारी यांना सामान्य जनतेची कीव कधी येणार हाच खरा प्रश्न आहे.
शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री करणाऱ्या रॅकेट वर अन्न व औषध प्रशासन विभागा व पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.