श्री विले पारले केळवणी मंडळ  यांचे जितेंद्र चव्हाण विधी महाविद्यालयाच्या वतीने मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

श्री विले पारले केळवणी मंडळ  यांचे जितेंद्र चव्हाण विधी महाविद्यालयाच्या वतीने मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन


--
मुंबई, विलेपार्ले येथील नेहरू नगर, अण्णा चाळ मैदानात 
जितेंद्र चव्हाण विधी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ. प्रिया शहा आणि 
समन्वयक प्रा. सुषमा म्हस्के यांच्या पुढाकाराने एक दिवसीय मोफत कायदेविषयक मार्गदर्शनशिबीराचे आयोजन दिनांक 7 मार्च २०२०रोजी करण्यात आले होते.


  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ( डीएलएसए) यांच्या सहकार्याने श्री विलेपार्ले केळवणि मंडळाचे जितेंद्र चव्हाण विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून  एक दिवशीय मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश्य प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या अनुछेद ३९ (अ) नुसार समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य मिळवून देऊन कोणीही आर्थिक किंवा इतर कारणांमुळे न्यायापासून वंचित राहणार नाही आणि न्याय मिळवण्यास असमर्थ होउ नये म्हणून सरकार च्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते,  या संदर्भातील माहिती जनसामान्यापर्यंत पोहचावी या मुख्यउद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते  
त्याच बरोबर लहान मुलांमुलीं सोबत होणारे वेगवेगळ्या प्रकारचे लैंगिक व इतर छळ वाढलेला घरगुती हिंसाचार , समाजातील घडत असलेले वेगवेगळे गुन्हे यावर अंकुश कसा ठेवायचा या संदर्भातील कायद्याची माहिती लोकांना मिळावी आणि जनजागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सचिव श्री विक्रमसिंह भंडारी , बृहन्मुंबई मनपा के वार्ड चे सहाय्यक आयुक्त श्री विश्वास मोटे हे होते तर या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी अनेक वकीलांनी महत्त्वाची भूमिका निभावली त्यामध्ये  अ‍ॅड.  राजीव शहा, अ‍ॅड.  तृप्ती पाटील, अ‍ॅड.  रेश्मा जगताप, अ‍ॅड. प्रास्पर डिसूझा, अ‍ॅड.  हितेश मगर आणि अ‍ॅड.  दीपक ठक्कर यांच्यासह जितेंद्र चौहान विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली.
या शिबिरात नेहरूनगर परिसरातील रहिवाशी मोठया प्रमाणात उपस्थित होते अनेकांनी आपल्या समस्या सांगून कायदेविषयक सल्ले घेतले व शिबिर शांततेत पार पडले व रहिवासी असलेल्या अनेकांनी समाधान व्यक्त केले.