नवघर पोलिसांनी गुटखा साठवून काळाबाजारी करणाऱ्या युवकाला ठोकल्या बेड्या
देशात कोरोनाचे थैमान सुरू असतानाच मीरा-भाईंदर मधे गुटखा माफियांनी आपले डोके वर काढले आहे संचारबंदीचा फायदाघेत गुटकाबंदी असतांनाही चढ्या भावाने गुटख्याचीविक्री शहरात केली जात आहे. काही दुकानादाराना चोरीच्या मार्गाने गुटखा पोहच करणाऱ्या युवकाला मुद्दे मालासह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्रात गुटका बंदी असतांना ही चोरीच्या मार्गाने शहरात गुटखा विकल्या जात आहे. गुटखा माफियांनी शहरात आपले जाळे पसरवले आहे. त्याचाच परिणाम शहरात दिसून आला आहे .
संपुर्ण देशात संचारबंदी लागू असतांना भाईंदर पूर्व भागातील कस्तुरी इस्टेटमध्ये राहणारा तरुण आपल्या घरीच गुटख्याची साठवणूक करून चोरीच्या मार्गाने दुकानात विकत होता.
नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कस्तुरी पार्क मध्ये गणेश मधूबन बिल्डिंग कस्तुरी पार्क नावाच्या इमारतीत तळमजल्यात गुटख्याचा साठा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिळून आला. यात मिळालेला गुटका जवळपास ८५,००० रुपयांचा असून एक होंडा कंपनीची ऍक्टिव्हा नावाची दुचाकी जप्त केली आहे.
नवघर पोलिसांना मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी सदर इमारतीच्या ठिकाणी जाऊन गुटखा साठवलेल्या ठिकाणी छापा टाकला. रात्रीची ९:३० च्या वाजताच्या दरम्यान ही कारवाई केली आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटखा दुचाकीवर घेऊन विक्री करत होता. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई केली. तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले तेंव्हा दुचाकी व मिळालेला गुटका पोलिसांनी जप्त केला आहे.
गुटखाबंदी असतांनाही गुटख्याची तस्करी करणाऱ्या युवकाचे नाव जयेश शर्मा असे आहे. या युवकाकडून गुटख्याची छुप्यापद्धतीने चोरून विक्री केली जात होती हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता असे स्थानिक नागरिक चर्चा करत होते. काही स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादात हा युवक गुटख्याची काळाबाजारी ,गुटख्याची तस्करी करत होता अशी चर्चा स्थानिक नागरिकांत ऐकायला मिळत होती .
नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३२८, १८८, प्रमाणे , अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२)(४),
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ३० (२)(a) आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ ५१ (b) प्रमाणे कारवाई करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रमोद पाटील हे अधीक तपास करत आहेत.