देशात करोना विषाणू ची लागण झालेल्या  रुग्णांच्या  संख्येत वाढ

 


देशात करोना विषाणू ची लागण झालेल्या  रुग्णांच्या  संख्येत वाढ


देशातील वाढते संक्रमण चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे. कालच्या पेक्षा आज कोरोनाची बाधा  झालेला आकडा आता ६०६ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत हा आकडा ८७ ने वाढला आहे. यांपैकी ५५३ संक्रमण झालेले रुग्ण आहेत तर ४२ रुग्णउपचार घेऊन बरे होऊन घरी गेले  आहेत. तर यांपैकी आत्तापर्यंत १० जण मृत्यूच्या विळख्यात सापडले.अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याकडून मिळाली आहे.


देशातील कोरोना विषाणूची लागण झालेली रुग्णांची संख्या  ५१९वर पोहोचली होती तर आज  ही संख्या ६०६ एवढी झाली आहे. त्यात आज (बुधवारी) मध्य प्रदेशमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याने ही कोरोनाच्या साथीने मृत्यू पावल्याची  संख्या ११ वर पोहोचली आहे.


देशात संपूर्ण पणे  ३२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केलं होतं. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत असल्याने आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. तरीही नागरिक गंभीरपणे या कोरोनाच्या साथीकडे पाहताना दिसत नाहीत . घरी बसण्याची सवय लावून न घेता घोळके बनवून नाक्यावर , चौकात थांबण्यात , चर्चा गप्पा मारत बसताना दिसत आहेत. अनेकदा तर भाजीपाला, किराणा दुकान वर गर्दी केली जाते सरकार कडून वारंवार सांगूनही सतर्कता ठेवली जात नाही त्यामुळे याचा परिणाम भविष्यात होईल अशी शंका उपस्थित होत आहेत.