होळी,धुळवंडीचा सण म्हणजे सप्तरंगात नाहून निघणारा सण आहे . होळीचा सण हा संपूर्ण देशात साजरा केला
जातो . पण करोना विषाणूच्या भीतीमुळे या वर्षीच्या होळी, धुळवंडीच्या सणवार संक्रात आली आहे.
देशातला गरीबातला गरीब आणि श्रीमंतांतला श्रीमंत व्यक्ती या सणांचा आनंद लुटत असतो . बालकांपासून ते वयवृद्ध व्यक्तीपर्येंत रंगात रंगणारा सण होय. देशातील प्रत्येक गावात, शहरात, प्रत्येक संस्कृतीत हा सण साजरा केला जातो. राजकारणी मंडळी, चित्रपट जगातातल्या कलाकार मंडळीची धुळवंड लोक आवडीने पाहातात .मौज मजेचा सण म्हूणन सगळेच मजा घेतात पण या वर्षीची होळी मात्र करोना व्हायरस मुळे , होळी आणि धुळवंडीवर देशातील जनतेने अघोषित बहिष्कार टाकला आहे असे वाटते आहे.
होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबांच्या ...... बंदुकीची गोळी म्हणत साहेबांच्या नावाने बोंब ठोकणारे बालपण , होळी पेटवण्यासाठी साहित्य जमा करतानाची मजा , धुळवंडीला " बुरा ना मानो होली है " म्हणत एकमेकांच्या अंगावर पिचकारीने रंग टाकण्याची मजा, रंगीबेरंगी रंगानी एक दुसऱ्याचे माखलेले चेहरे हे सगळे करण्यापूर्वी या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची ५ ते १० दीवस अगोदर केली जाणारी खरेदी, धुळवंडीचा ठरवला जाणारा बेत, मित्रांच्या एकत्र येऊन होणाऱ्या पार्ट्या या वर्षी लुप्त झालेल्या दिसत आहेत.
करोना व्हायरस ने जगभरात घातलेला जीवघेणा धुमाकूळ पाहता भारतात जनजागृती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आणि करोना च्या विषाणू पासून दूर राहण्यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. त्यामुळे या वर्षीची धुळवंड फिकी दिसत आहे . बाजारात विक्रीसाठी पिचकारीसह वेगवेगळे रासायनिक रंगीबेरंगी रंग आलेले आहेत पण खरेदीसाठी येणारा वर्ग मात्र या रंगीबेरंगी रंगाने भरलेल्या बाजारात ग्राहक मात्र फिरकताना दिसत नाही. करोनाच्या विषाणूने घातलेला धुडगूस पाहता जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात या व्हायरस वर औषध तयार करण्यात आले नाही त्यामुळे त्यामुळे डॉक्टर सह सगळेच हातबल झालेले आहेत. सुदैवाने भारतात याचा परिणाम झाला नसला तरीही काळजी घेणे गरजेचे आहे म्हूणन सगळेच सजग झालेले आहेत. होळीचा सण जवळ येतोय म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे व्यापारी वर्गाने वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या सह रंगीबेरंगी रंगानी मार्केट फुलवले खरे पण भीतीच्या सावटाखाली आज रंगाची होळी खेळली जाईल का ? की करोना विषाणूच्या भीतीने यावर्षी होळी व धुळवंडीचा रंग फिका केलाय असेच म्हणावे लागेल. असे सध्यातरी चित्र संपूर्ण भारतात आहे.