घोडबंदर गांवात अनधिकृत बांधकाम ,ला प्रभाग अधिकाऱ्याचे अभय
भार्इंदर (प्रतिनिधी) : मीरा भाईंदर शहर म्हणजे अवैध बांधकामाकाची बजबजपुरी म्हणून ओळखले जात आहे. अनेक नगरसेवक , अधिकारी अवैध बांधकामाचे पैसे घेतांना रंगेहाथ पकडले गेले. पण अवैध बांधकामाचा जोर कमी होतांना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढतच आहे. घोडबंदर गांव, जरीमरी मंदिराजवळ सर्व्हे नं.२४७, हिस्सा नं.१, मध्ये दुरुस्ती च्या नावावर आखी इमारत उभी केली जात आहे . प्रभाग अधिकारी , इंजिनियर , मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख यांचा आशीर्वाद लाभला आहे.
मुंबईला लागूनच असलेल्या मीरा भाईंदर शहरात पावलोपावली अवैध बार , डान्स बार, लॉजिंग उभ्या दिसत आहेत. अनेक बार , लॉजिंगला अवैध बांधकाम केले म्हणून नोटीस बजावल्या आहेत, पण नोटिसा बजावलेल्या बार , लॉजिंग आता पर्येंत तोडण्यात आलेल्या नाहीत . घर दुरुस्तीच्या आड टोलेजंग इमारती तर विनापरवाना इमारतीअधिकाऱयांना हाताशी धरून मोठया उभ्या केल्या जात आहेत.
घोडबंदर येथील जरीमरी मंदिरा जवळ सर्व्हे नंबर २४७, हिस्सा नंबर १ मध्ये अशीच दुरूस्तीच्या आड ईमारत उभी केली जात आहे.
घोडबंदर येथील मालमत्ता क्र.००१००२३२४०००० ही जागा सामाईक मालकीची असून या जागेत हॉटन घोन्सालवीस यांचं जुने घर होते . या घराची दुरुस्ती करण्यासाठी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी पालिकेला अर्ज केला होता. त्यानंतर बांधकाम अभियंता राजेश म्हात्रे यांनी २० फेब्रुवारी २०१९ रोजी संरचनात्मक तपासणी अहवाल दिल्यानंतर सदर दुरुस्तीस परवानगी देण्यात आली. ही परवानगी ही पैसे घेऊन देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
परंतु घोन्सलविस यांनी सदर घराची दुरुस्ती करण्याऐवजी त्या जागी तीन मजली इमारतीचं बांधकाम सुरु झालं. याबाबत सामाईक हिस्सेदार नॉटली घोन्सालवीस यांनी २८ मे १९ रोजी प्रभाग क्र.४ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्याकडे जाऊन ही माहिती निदर्शनास आणून दिली तरीही बांधकाम चालूच राहिले. त्यानंतर नॉटली यांनी तत्कालीन आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तानीही सदर तक्रारीला केराची टोपली दादाखविल्याने नॉटली यांनी २१ नोव्हेंबर २०१९ रोजी सदर बांधकामास न्यायालयाकडून स्थगिती आणली.
हॉटन घोन्सालविस यांनी दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला दिलेली कागदपत्रे छायाचित्रे व न्यायालयास दिलेली कागदपत्रे / छायाचित्रे वेगवेगळी असून. न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे.
न्यायालयाच्या स्थगितीलाही न जुमानता प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने सदर अनधिकृत इमारतीचे वाढीव बांधकाम पुर्णत्वास आले आहे.