टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यासाठी आणि शौचालयासाठी देयक घेणे केलें बंद  :-  महापौर ज्योत्स्ना हसनाळे


टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यासाठी आणि शौचालयासाठी देयक घेणे केलें बंद  :-  महापौर ज्योत्स्ना हसनाळे


शहरातील सार्वजनिक शौचालय आणि टँकरद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्यासाठी जे देयक द्यावे लागते ते या संचारबंदीच्या काळात घेणे बंद करण्यात आले आहे तशी सूचना शहर अभियंता शिवाजी बरकुंड यांना देण्यात आल्या आहेंत अशी माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी पोलिस मदत पत्र सी बोलताना दिली.


देशातील जनतेने अनेक संकटाशी सामना केला आहे. अनेक वेळा देशाच्या दुष्मणाशी लढाई करून लढाई जिंकली आहे. तशीच ही देखील अदृश्य वैऱ्याच्या विरोधातील  लढाई लढण्याची तयारी करावी लागेल त्या साठी जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. जनतेने एक मेकापासून संपर्क टाळणे हाच पर्याय आहे. म्हणून बाहेर जाणे टाळा घरात परिवारात आनंदाने दिवस घालवा, परिवाराला वेळ द्या हीच देश सेवा आणि समाज सेवा सध्यपरस्थितीला होईल असे कळकळीचे आवाहन महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी केले आहे.


देशातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आठवड्यापासून सुरू असलेला संचारबंदीचा काळ पाहता शहरातील विविध वस्त्यांमध्ये अनेक समस्यांना तोंड देत नागरिक जगत आहेत. जिथे मनपाची नळ जोडणी सुविधा नाही अशा वस्त्यांसाठी शहरातअनेक ठिकाणी मनपाच्या माध्यमातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी देयक (आर्थिक मोबदला )घेऊन पुरवण्यात येत होते, त्याच बरोबर शहरातील अनेक ठिकाणी शौचालय हे शुल्क देऊन  वापर केला जातो. कोरोनाच्या साथीचा वाढता प्रभाव आणि सुरूअसलेल्या संचारबंदीने सर्वसामान्य लोकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हाताला काम मिळाले तरच, प्रपंच चालतो अशी परिस्थिती शहरातील अनेक कुटुंबाची आहे. त्यामुळे नागरिकांना या संचारबंदीच्या काळात मानपाकडून टँकरद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे देयक घेतले जाणार नाही आणि त्याच बरोबर शौचालयात देयक देऊन वापर केला जात होता. त्या वापरासाठीही पैसे घेणे बंद केले गेले आहे. अशी माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी पोलिस मदत पत्र सी बोलतांना दिली.त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.



शहरातील प्रत्येक शासकीययंत्रणे बरोबरच  निमशासकीय व्यक्तिद्वारे अनेक संस्था, मंडळे कोरोना विषाणूच्या लढाईत लोकांच्या सेवेसाठी सामाजिक भूमिकेतून प्रशासनाला आणि जनतेला मदतीचा हात पुढे करत आहे.कार्यकर्त्यासोबत जनतेच्या सहकार्याने देखील हा लढा ,लढला जात आहे, त्याच बरोबर नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मीरा-भाईंदर मनापा पूर्णपणे तयारी करत आहे असे महापौर यांनी सांगितले आहे.