अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना एसीबी ने ठोकल्या बेड्या :- पोलिस मदत पत्र बातमी

भ्रष्टाचार हा देशाला लागलेला रोग आहे. या रोगाची लस भ्रष्टाचारी किड्यांना देणें गरजेचेआहे पण ती मानसिकता सरकार मध्ये बसलेल्या बड्या धेंड्याची नसल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्याचे  फावते आहे. संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी वर्ग त्रासून टाकलेल्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी असलेले कृष्णा दाभाडे यांना एसीबि ने बेड्या ठोकल्या आहेत. 


गुरुवारी सकाळी त्याला ३५ हजाराची लाच घेताना एसीबीने बीड येथील कार्यालयात पकडले. सोबत एका खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.


अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दाभाडे यांच्याबद्दल जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मोठ्या तक्रारी होत्या. एका झेरॉक्स सेंटर चालकास लाचेची मागणी केल्यानंतर त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यावरून गुरुवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून  बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने एफडीएच्या बीड येथील कार्यालयात सापळा रचला.


यावेळी स्वतःच्या कार्यालयातच एका दलालाच्या माध्यमातून ३५ हजाराची लाच घेताना कृष्णा दाभाडेला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाई नंतर व्यापाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.


 व्यापाऱ्याशी संबंध
बेकारी, अन्न प्रक्रिया केंद्र अशा ठिकाणी स्वतः जाऊन दाभाडे लाचेची मागणी करत असत अशी माहिती आहे. यासोबतच बीड येथील  व्यापाऱ्यासोबत त्याचे अनेक दिवसांपासून संबंध असल्याची चर्चा शहरात आहे.


या कारवाईमुळे व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.