शहरातील व्यावसायिकांना महापौरांचे आवाहन

शहरातील व्यावसायिकांना महापौरांचे आवाहन


मीरा-भाईंदर शहरात अनेक नामवंत व्यापारी, धनिक, बिल्डर कंपनी मालक चालक आहेत.अनेक दानसूर व्यक्ती या शहरात आहेत त्या सर्वनी कोरोना   रोगाच्या साथीला रोखण्यासाठी शहरात मदतीचे हात पुढे करून शहरवाशीयांना मदत करण्यास पुढे यावे असे विनंती वजा आवाहन महापौर जोस्तना हसनाळे यांनी  केले आहे.



देशांमध्ये असलेल्या संचार बंदीचा फटका इथे राहणाऱ्या गरीब समुदायाला, कामगारांना, मजुरांना,आजाराने पीडित असलेल्या कुटुंबाना पडताना दिसत आहे. अनेक कामगार हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मजुरी करून कुटुंबाचा पोट-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावं सोडून शहरात आलेला कामगार वर्ग उपाशी राहता कामा नये. यासाठी सरकार च्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनही आपल्या स्तरावर काळजी घेत आहे.अनेक सामाजिक संस्था, एनजीओ,सामाजिकमंडळे, यांच्याकडून मदतीचा हात पुढे येत आहे.


या शहरातल्या अनेक नामवंत व्यावसायिकांनी पुढे येऊन झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या गोरगरिबांसाठी, कामगारांसाठी,मजुरांसाठी, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांसाठी, बेघर असलेल्या कुटुंबांसाठी, मदतीचा हात पुढे करण्याचे आव्हान मीरा भाईंदरच्या महापौर जोस्तना हसनाळे यांनी शहरातल्या व्यापारी, बिल्डर, कंपनी मालक,चालक  वर्गाला विनंती केली आहे.


मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, आणि ती संधी परिस्थितीने आज निर्माण झालेली आहे. प्रत्येकाने माणुसकी दर्शन दाखवून, शहरात कोणी उपाशी पोटी झोपणार नाही या भूमिकेने शक्य होईल तेवढे एकमेकांना मदत करावी. त्याचबरोबर कोरोना साथीचा सामना करण्यासाठी त्याला शक्य असेल त्यांनी महापौर निधीमध्ये मदत ही करू शकतात त्यांनी सहकार्य करावे आणि शहराला या महामारीच्या रोगापासून रोखण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती वजा अवाहन महापौर   जोस्तना हसनाळे यांनी केलेआहे.