राजकीय दबावाने थांबले विलगीकरन कक्षाचे काम

रोड : कोरानाचा वाढत चाललेला उद्रेक पाहता संपूर्ण देश भीतीच्या सावटा खाली वावरतो आहे. कोरोना ची लागण झालेले लोक हे बाहेर देशात जाऊन परत आलेल्या लोकांना लागण झालेली जास्त प्रमाणात दिसुन आली आणि त्यांच्या सहवासात जे राहिले त्यांना ही या कोरोना रोगाची  लागण झालेली दिसून आली आहे. हा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत पण मीरा भाईंदर मात्र जनतेच्या  सुरक्षेसाठी कमी पडत असताना दिसत आहे. 


आखाती देशात किंवा परदेशात काम करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या ,त्याच बरोबर पर्यटन वारी, मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे . या शहराची लोकसंख्य १५ लाखाच्या जवळपास असतांना ही या शहरात अशा उद्धभवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी इथल्या नागरिकांच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आता पर्येंत  एकही विलगीकरण (कोरेनटाइन) कक्ष सुरू झालेले नाही. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


मीरारोड च्या डेल्टा गार्डन टॉवरच्या मागे असलेल्या म्हाडाच्या इमारतीत विलागीकरन केंद्र उभारण्याची तयारी सुरू केली होती पण तेही बंद करावे लागले.  मीरा-भाईंदरमध्ये राजकीय दबावामुळे एकही विलगीकरण (कोरेनटाइन) कक्ष सुरू झालेले नाही.


 मीरा रोडच्या डेल्टाजवळील स्वतंत्र इमारत यासाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि राजकीय दबावामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
मीरा-भार्इंदर शहरात कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही.  खबरदारीचा भाग म्हणून विलगीकरण कक्ष असणे गरजेचे आहे . पण अद्याप पर्येंत या शहरात ते उभारलेले नाही.  मीरा-भार्इंदर महापालिका व महसूल विभागाने मीरा रोडच्या डेल्टा वसाहतीमागील सरकारी इमारतीची निवड केली आहे.
स्वतंत्र असलेली ही इमारत या कक्षासाठी योग्य असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला. मात्र, भाजप नगरसेवक मोहन म्हात्रे, वीणा भोईर आदीनी काही रहिवाशांसह या कक्षाला विरोध केला आहे.


समजावून सांगूनही उपयोग नाहीच


 महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या दालनात मंगळवारी विरोध करणारे नगरसेवक आणि नागरिकांची बैठक झाली.
यावेळी आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ आदी उपस्थित होते. आयुक्तांसह डॉक्टरांनी महापौर, नगरसेवक तसेच नागरिकांना समजावून सांगण्याचा मनातली भीती काढण्याचा पर्येंत  केला पण कोणी ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे हे विलागीकरंन कशाचे काम सध्यातरी स्थगितच आहे.