मिरा-भाईंदर मध्ये अखेर अलगीकरन कक्ष तयार , आयुक्त डांगे यांनी केली पहाणी :- पोलिस मदत पत्र बातमी

मीरा-भाईंदर मनपा क्षेत्रात अलगीकरण कक्ष तयार केले गेले असून या कक्षात प्रत्येक व्यक्तीला एक रूम , बेड, किचन, वायफाय, टीव्ही, पंखा अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अलगिकरण केंद्राला मनपा आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली.


कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असताना मीरा-भाईंदर मनपाकडून अलगीकरण केंद्र मीरा रोडच्या डेल्टा गार्डनजवळील स्वतंत्र इमारत यासाठी निश्चित करण्यात आली होती.पण या साठी स्थानिकासह नगरसेवकांनी याला  विरोध केला. तेव्हा या संदर्भात  स्थानिकांचा व नगरसेवक ,सभापती, महापौर यांची मिटींग महापौर दालनात झाली.


आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ आदी उपस्थित होते. आयुक्तांसह डॉक्टरांनी महापौर, नगरसेवक तसेच नागरिकांना समजावूनही कोणी ऐकण्यास तयार नव्हते . त्याच धर्तीवर गोल्डन नेस्ट येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स  समोर असलेल्या एमएमआरडीए च्या इमारतीत तयार करण्यात येणार याची माहिती मिळाताच स्थानिक नागरिक व नगरसेवक यांनी विरोध केला आहे.


आमदार गीता जैन यांच्या सोनम बिल्डरने बनवलेली एमएमआरडीए च्या इमारतीचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला . विरोध करणार नाहीत ते विरोधक कसले याच धर्तीवर त्यांच्या कार्यालयासमोर विरोधकांनी स्थानिकांना पुढे करून अप्रत्यक्षपणे विरोध केला असी चर्चा सुरू आहे.


या केंद्रालाही विरोध करण्यासाठी स्थानिकानी विरोध करत असताना येथे दंगल नियंत्रण पथक मागवण्यात आले. त्यानंतर दोन तासांनंतर विरोध कमी झाला. 
मीरा भाईंदर  मनपाची यंत्रणा कोरोना संसर्गचा संभाव्य धोका  टाळण्यासाठी अतिदक्षतेने काम करत आहे. १०० रूम ची तयारी तयारी सुरू केली आहे. त्यापैकी ३१ बेड चे अलगिकरण कक्ष  गोल्डन नेस्ट , स्पोर्टस कॉम्प्लेक्स च्या समोर एमएमआरडीए च्या इमारतीत तयार करण्यात आले आहे . या अलगिकरण केंद्रास भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. आवश्यकता भासली तर  आणखी रूम तयार केल्या जातील असे मनपा आयुक्त डांगे यांनी सांगितले.


 या अलगिकरण कक्षात परदेशातुन आलेले नागरिक व सध्य स्थितीला गंभीर आजाराने पिडीत असलेल्या व्यक्तींना या आजाराचा संभाव्य धोका उदभवू नये म्हणून इथे काळजी घेतली जाणार आहे. १४ दिवस त्यांना या केंद्रात देखरेखीखाली ठेवले जाणार आहे . त्या काळानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे.


मीरा-भाईंदर मनपा चे सर्व यंत्रणा, विभाग, आधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, विदूत विभाग,आपत्ती व्यवस्थापन, करोना या संसर्गजन्य विषाणू ची रोखधाम करण्यासाठी  दिवस रात्र कार्यरत आहेत.त्याचाच परिणाम की मनपा हद्दीत एकही कोरोना विषाणूने शहरात बाधित एकही रुग्ण आज पर्यंत सापडला नाही. आता पर्येंत परदेशातून आलेल्या ११५ जणांना अलगिकरन केंद्रात ठेवले होते. त्या पैकी आता पर्येंत २४जणांना घरी पाठवले आहे . मीरा-भाईंदरकरांच्या सुदैवाने एकही रुग्ण या शहरात आता पर्येंत लागण झालेला मिळाला नाही.


येणाऱ्या परिस्थिती ला सामोरे जाण्यासाठी  मनपा सर्व स्तरावर खबरदारी म्हणून अलगिकरन कक्षासह ,आयसुलेट कक्ष ही  शहरातल्या सात हॉस्पिटलमध्ये तयार केले आहेत या आयसुलेट कक्षात ऐकून ३६ वेगवेगळ्या रूम तयार ठेवण्यात आले आहेत. 
अलगिकरन कक्षात बेड , वायफाय सेवा, टीव्ही, पंखे, किचन यांची सुविधा उपलब्ध आहेत. या अलगिकरन कक्षात ज्या प्रवाशांना घरी राहण्यास सांगण्यात आले अश्या संशयितांनी नियम पाळले नाही तर त्यांना अलगीकरन कक्षात ठेवण्याची शक्यता आहे.या अलगिकरन कक्षात डॉक्टर, नर्स, व इतर वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदोबस्त असणार आहे. कोरोना विषाणूची लागण इतरांना होऊ नये म्हणून  जनतेची काळजी  घेतली जात आहे मीरा-भाईंदर मनपा प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे . मीरा-भाईंदर मधील जनता ही तेवढेच उत्तम प्रकारे सहकार्य करत  असून  सहकार्याची भूमिका घेतल्या चे चित्र आहे व मीरा भाईंदर मधील नागरिक गर्दी टाळत आहेत  मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरी मुळे सर्वत्र कौतुक होत आहे.