महापौर व नगरसेवकांच्या देखरेखीखाली केली प्रभाग क्रमांक १४ जंतुनाशक औषधांची फवारणी.

महापौर व नगरसेवकांच्या देखरेखीखाली केली प्रभाग क्रमांक १४ जंतुनाशक औषधांची फवारणी.


कोरोना साथीला रोखण्यासाठी आणि शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे कोरोनाच्या विषाणूपासून नागरिकांचा बचाव व्हावा कोणताही प्रादुर्भाव होऊ नये याची दक्षता घेत आज प्रभाग क्रमांक १४ मध्ये रस्ते गलोगल्ली जंतुनाशक फवारणी करण्यात आली. ही फवारणी करतांना महापौर स्वतः जातीने उपस्थित होत्या व प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते.


  प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका तथा महापौर जोस्तना हसनाळे, नगरसेविका मिरादेवी यादव, नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी सभापती अनिल भोसले, तुषार पारधी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रभागात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली.


महापौर जोस्तना हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवकानीं संपूर्ण प्रभाग जंतुनाशक औषध फवारणी अग्निशमन दलाचे जवानांच्या मदतीने फवारणी करून घेण्याचे काम सुरू आहे.
  
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशामक दल जवानांनी यावेळी गावठण (चेक नाका) ते काशीमीरा डोंगरी, साईकृपा कॉप्लेक्स, मनाली कॉम्प्लेक्स, ग्रीनविलेज,वेस्टर्न पार्क, मिनाक्षी नगर ,मांडवीपाडा, गगनगिरी, माशाचापाडा, डाचकूलपाडा, चेना सह अनेक वस्त्यांमध्ये जाऊन जंतुनाशक औषधांची फवारणी केली. मीरा-भाईंदर प्रभाग १४ या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळीची वस्ती आहे. या विभागात ५० हजार पेक्षा जास्त लोकवस्ती असून याठिकाणी लोक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महापौरांचे सहकार्य आणि स्थानिक नगरसेवक यांनी फवारणी करण्याची मागणी केली होती.याठिकाणी विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास परिस्थिती आटोक्यात आणणे अवघड होऊन जाऊ शकते. विशेष म्हणजे शहरातील अनेक वस्त्यामध्ये जंतुनाशक औषधांची  फवारणी केली जात आहे. ही फवारणी कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केली जात आहे.
या परिसरात अनेक सार्वजनिक शौचालय आहे, छोटी छोटी गटारे, घाण सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाले आहेत त्यामुळे लोकांच्या आरोग्य निरोगी रहावे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ नये म्हणून ही काळजी घेतली गेली आहे असे मीरा-भाईंदर मनपा महापौर जोस्तना हसनाळे यांनी सांगितले.