संचारबंदीचे जालन्यात मात्र तीनतेरा
संपूर्ण देशात हहंकार उडालेला असतांना संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. कोरोना साथीच्या वाढत्या वादळाला रोखण्यासाठी सरकाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे . या संचारबंदीचे जालन्यात मात्र तीनतेरा वाजताना दिसत आहेत.
कोरोनाच्या विषाणू संसर्ग रोखता यावा म्हणून , सरकारने देशभरात जनता कर्फ्यु लागू करण्यात आली होता, यात डॉकटर,कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचे आभार मानण्यासाठी सायंकाळी 5 वाजता थाळी,घटा,टाळ्या वाजवून घरातील बाल्कनी घरासमोर उभे राहून वाजवायचे होते.परंतु जनतेने तसे न करता मिरवणूक काढून डीजे वाजून चौका चौकात एकत्र येऊन अस्यां चुकीच्या पद्धतीने आभार व्यक्त केले.यामुळे शासनाच्या या निर्णयाला जनतेनेगांभीर्याने घेतलेले दिसले नाही.
राज्य सरकारने निर्णय घेतला की राज्यभरात संचारबंदी ३१मार्च पर्यत लागू केलेली आहे.यामध्ये फक्त जिनावश्यक वस्तू व आरोग्य विषयक सेवा व्यतिरिक्त सर्व बंद ठेवण्यात येईलअसा निर्णय घेतला आहे.
राज्यभरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. यात ५ पेक्षा जास्त लोक आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.याची सर्वांनी दक्षता घ्यावी.सर्व शहरात संचारबंदी सक्तीची करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन कडक कारवाई करत आहे.सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.परंतु जालन्यात याची पायमल्ली करण्यात आली आहे.यात जनता ही या संचारबंदी ला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसून आले आहे.शहरात लोक एकत्र दिसून आले आहे.
काही ठिकाणी भाजीपाला विक्रेते किराणा दुकानात लोक एकत्र गर्दी करीत आहे जर असेच असलेतर संचारबंदी चा काय उपयोग असा प्रश्न पडतो आहे. कोरोना साथीला थांबण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याची गरज आहे असे अनेक सुज्ञ नागरिकांना वाटते आहे.