तपासणी सुरू असताना वादावादी, कर्मचाऱ्यांवर सुऱ्याने केले वार
तपासणी नाक्यावर तपासणी सुरू असताना बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या तिघा संशयितांना पकडून गाडी जप्त करातच रागातून चक्क राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात घुसून तेथील कर्मचाऱ्यावर सुर्याने केले वार ,रमेश चंदुरे हा शासकीय कर्मचारी जखमी झाला आहे.
बेकायदेशीर पणे दारू साठवणे , तिची वाहतूक करणे किंवा विक्री करणे हा कायद्याने बंदी घातली असली तरीही समाजातील काही असामाजिक तत्वे असे बेकायदेशीर कृत्य करताना दिसत आहेत. या सामाजिक वातावरण बिघडवणार्या वृत्तीच्या पाठीमागे पडद्या आड काही राजकीय, शासकीय अधिकारी वर्ग छुप्या पद्धतीने पाठिंबा देते. त्यांचे संबंध कसे असतात हे अनेक वेळा जगजाहीर झालेले आपण पाहिले आहेत.
इन्सुली येथील नाक्यावर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून तपासणी सुरू असतांना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी सावंतवाडी-माजगाव येथील तिघांवर हल्ला करुन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन प्रकाश सूर्यवंशी (रा. माजगाव-तांबळगोठण), संभाजी विनायक देसाई (रा. कुंभारवाडा) व बाळा राठवड (रा. कासारवाडा) अशी या संशयातांची नावे आहेत. जप्त केलेली दारूची गाडी कार्यालयाच्या मागे का लावली नाही या वादातून हा प्रकार घडला. यातून सूर्यवंशी याने आपल्या हातात असलेल्या सुर्याने वार केले यात चंदुरे हा कर्मचारी जखमी झाला. तेथील कर्मचारी शैलेंद्र चव्हाण यांनी बांदा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती बांदा पोलिस ठाण्यातून देण्यात आली.