धक्कादायक माहिती हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची कमी ?

 





धक्कादायक माहिती हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची कमी ?" alt="" aria-hidden="true" />



जगभरावर आलेले कोरोनाचे  संकट आणि या संकटाने भारतात केलेले संक्रमण पाहता. देशाच्या सरकाने फार काळजीपूर्वक पाऊल उचलणे गरजेचे आहे. या जीवघेण्या साथीचा सामना करण्यासाठी हॉस्पिटलच्या सुविधाही तितक्याच सुसज्ज असायला हव्यात. त्यातल्या त्यात हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटची संख्या पुरेशी हवी अशी चर्चा सातत्याने होतात. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईतल्या बहुतांश हॉस्पिटल्समध्ये व्हेंटीलेटरच शिल्लक नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मोठे मोठे हॉस्पिटल म्हणून ज्यांची ख्याती आहे असे अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची कमी आहे अशी माहिती समोर येत आहे. 


सध्याची परिस्थिती पाहता हॉस्पिटलमध्ये अधिक साहित्य असणे गरजेचे आहे . पण सध्या अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटीलेटर आहेत पण ते आधीच्या रुग्णांना लावलेले आहेत.त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी जर व्हेंटीलेटरची गरज भासली तर अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सध्या अनेक रुग्णालयांमध्ये व्हेंटीलेटरच शिल्लक नसल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे.यात बीएमसीच्या अनेक हॉस्पिटलचा समावेश आहे.


कोरनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सरकारने मोठ्या प्रमाणात व्हेंटीलेटर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.


मुंबईतील हॉस्पिटलचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा


केईम हॉस्पिटल २२५
सायन हॉस्पिटल १२६
जेजे हॉस्पिटल ८९
भाभा हॉस्पिटल १७
राजवाडी हॉस्पिटल १३
व्ही एन देसाई हॉस्पिटल १५
डॉ आंबेडकर हॉस्पिटल ३०
लिलावती हॉस्पिटल ४४
हिंदू महासभा हॉस्पिटल १०
हिरानंदानी हॉस्पिटल १६
एसआरसीसी हॉस्पिटल १८


परिस्थिती नाजूक आहे कोरोनाग्रस्त रूग्णांची राज्यातील संख्यने ही १०० आकडा पार केलेला आहे . आणखी कोरोनाची लागण झालेले रुग्णांची संख्या वाढू शकते त्यामुळे सरकारने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे असे सर्वसमान्यांना वाटते आहे.