मीरा-भाईंदर शहरात नवीन पन्नास भाजीपाला दुकाने सुरू, आयुक्तांचा नागरिकांना दिलासा
मिराभाईंदर शहराला सुरळीतपणे भाजीपाल्याचा पुरवठा होण्यासाठी पूर्वी सुरू असलेले अधिकृत भाजीपाला दुकाने सुरूच राहतील त्या व्यतिरिक्त मनपा आयुक्त डांगे यांनी मिरारोड नयानगर येथील हजरत मैदानात,भाईंदर पश्चिम येथे सुभाषचंद्र बोस मैदानात व अन्य ठिकाणी भाजीपाला विक्रीची दुकाने सुरू करण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भाजीपाला विक्रेत्यांकडून होणारी नागरिकांची लूट नक्कीच थांबेल अशी अपेक्षा आहे.
शहरातील नागरिकांची भाजीपाल्याची समस्या पाहता व भाजीपाला विक्रेत्यांकडून सामान्य माणसांची होणारी लूट पाहता अतिरिक्त भाजीपाल्याची दुकाने शहरातल्या गरजे नुसार वाढवले जातील असे यापूर्वी सांगितले होते त्याप्रमाणे मिरारोड येथे काणूनगो स्टेट च्या जवळ हजरत मैदानात नवीन पन्नास भाजीपाला विक्री दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. आज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या ठिकाणी भाजीपाला विक्री केली जाणार आहे . उद्या पासून ही वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल असे एम बी एम सी आयुक्त डांगे यांनी सांगितले .
आजपासून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार सुरू
आजपासून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपाला इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे.
मीरा-भाईंदर शहराला सुरळीतपणे भाजीपाला
मीरा-भाईंदर शहराला सुरळीतपणे भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी एम बी एम सी प्रशासनाकडून योग्य ती काळजी
घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुभाषचंद्र बोस मैदान, शहरात जी मैदानाचा उपयोग करून भाजीपाला विक्री दुकाने सुरू केेलीआहे याचा फायदा कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी होईल. सुरक्षित अंतर ठेवून समान खरेेदी करता येईल.
.
भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्याना आडवू नये
असे आदेश सरकारच्या वतीने भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्याना पोलिसांनी आडवू नये, असे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामे वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी, असे आदेश दिले आहेत. शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा, असं आवाहन सरकारने केले आहे.