कोरोना मुळे नात्यात निर्माण होतोय दुरावा

कोरोना मुळे नात्यात निर्माण होतोय दुरावा


कोरोना रोगाच्या साथीने  संपूर्ण जग हादरले आहे. शहरी भागातू मोठया प्रमाणात ग्रामीण भागात जाणाऱ्यांची  संख्या वाढली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे शहर तसेच गावाकडे दुकाने, शाळा, खासगी कार्यालये बंद झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पुणे, मुंबई सारख्या शहरातून  ग्रामीण भागात मोठ्या संख्येने लोकांचे लोंढे जात आहेत.  त्यामुळे गावंवस्तीवर राहणाऱ्या लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.


नात्यात ही निर्माण झाला दुरावा


 शहरातून आलेल्या नात्यातील लोकांना बोलणं, भेटण टाळलं जात आहे. रक्ताच्या नात्यातील मंडळी सुद्धा करोनाच्याभीतीमुळे भेटीगाठी टाळत आहेत.नात्यात ही निर्माण झाला दुरावा असेच  चित्र गावखेड्यावर पाहायला  मिळत आहे.


गावाशी नात विसरलेले पुन्हा गावी


पुणे मुंबई सारख्या शहरात रोजगार शोधण्यासाठी आलेले हजारो लोक मुंबई पुण्यात स्थायिक झाले आहेत.गावाशी नातं तोडून शहरात रममाण झालेल्या, कधीही गावाची ओढ नसलेली मंडळी ही भौतिकसुखामागे धावणारी मंडळी. कोरोनाच्या भीतीने आता आपल्या मूळगावी परतत आहेत. 


ग्रामीण भागांत अद्यापि करोनाची तपासणी करण्याची सोय नाही. केवळ प्रत्येक नगरपालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. करोना जरी झाला तरी उपचार सुविधा व यंत्रणा ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही.  जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोरोनाला तितकेसे मनावर घेतले नाही


तर काही  फाजील आत्मविश्‍वास  असलेल्या लोकांना कोरोनाच्या संदर्भातील गांभीर्य नाही. रोग आपल्या गावात पोहचू शकत नाही. अशी भावना आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी या रोगाचा होणारा प्रादुर्भाव तितकासा मनावर घेतला नाही. हा आजार आपल्याला होऊच शकत नाही.  आपल्यापर्यंत येत नाही, अशा विचारांत राहिल्यास हा संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे  बाहेर गावाहून गावखेड्यावरआलेल्या व्यक्‍तींनी सुद्धा आपली स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर गाव सुरक्षित राहील.