बोगसपने अत्यावश्यक सेवेचे फलक लावून फिरणाऱ्यावर पडली पोलिसांची  नजर , टवाळखोरांवर उगारला कारवाईचा बडगा  (पोलिस मदत पत्र) 

 


 


बोगसपने अत्यावश्यक सेवेचे फलक लावून फिरणाऱ्यावर पडली पोलिसांची  नजर , टवाळखोरांवर उगारला कारवाईचा बडगा 


(पोलिस मदत पत्र)


देशात कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी सरकार गंभीर होऊन कर्तव्य निभावत आहे तर दुसरीकडे या संचारबंदीला कवडीमोल किंमत देत कायद्यांचे उल्लंघन करणारी रिकामंटेकडी मंडळी अत्यावश्यक सेवेच्या बहाण्याने रस्त्यावर पोलिसांना चकवा देत फिरत आहेत. ही परस्थिती अनेक शहरात आहे,महानगरात आहे. तीच परिस्थिती मीरा-भाईंदर मध्ये पाहायलामिळाली.


         पोलिसांची फसवणूक करून टवाळखोरी करत रस्त्यावर बिनकामाची गर्दी करणाऱ्या दिडशहण्या रिकामटेकड्याच्यावर अखेर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे . अत्यावश्यक सेवेचे फलक लावून फिरणाऱ्या टोळक्यांचा समाचार घेत तब्बल १२९ दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणाऱ्या टवळगीरावार कारवाई केली आहे.


  पोलिसांनी मीरा-भाईंदर शहरात संचार बंदीचे उल्लंघन करत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली
फिरणाऱ्या १२९ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव  रोखण्यासाठी केंद सरकारकडून १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाच घराबाहेर पडण्यासाठी सध्या नागरिक अत्यावश्यक सेवेच्या  नावाचा फायदा उचलत घरा बाहेर पडत असल्याचे नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या लक्षात आले.बंद असूनही दुचाकी घेऊन विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्या टवाळखोराना अनेकदा पोलिसांनी दांडूक्याचा प्रसाद दिल्यानंतर पोलिसांच्या दांडूक्याचा मार चुकवण्याकरीता टवाळखोर छुप्या मार्गाचा वापर करून परिसरात फिरत होते. 


          लॉकडाऊनच्या काळात  टवाळखोरांचा उपद्व्याप काही केल्या थांबत नसल्याने भाईंदर पुर्वच्या बीपी रोड, गोडदेव नाका ,गोल्डन नेस्ट ,इस के स्टोन , मैक्ससेस मॉल अश्या अनेक  मुख्य नाक्यावर मीरा भाईंदर मधील पोलीसांनी व वाहतूक पोलसांनी गस्त सुरू केली होती. गोल्डन नेस्ट परिसरात सोमवारी सुरु असणाऱ्या नाकाबंदी दरम्यान प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच मग त्याला सोडलेजात होते.मीरा भाईंदर  मध्ये पोलिसांच्या नाकाबंदीत आत्यावश्यक सेवेचे खोटे फलक लावून फिरणारी अनेक वाहने सापडली. तर विना नंबर प्लेट वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.विनाकारण घराबाहेर पडणे व वाहतुकीच्या नियमांचे  उल्लंघन करणाऱ्या १२९ हुन अधिक दूचाकी वाहन चालकांवर  कलम १७९ प्रमाणेकारवाई करण्यात आली आहे. कारवाईत पोलीस उप निरीक्षक एम .जी. पाटिल, सुधीर पाटिल, वाहतूक कर्मचारी चौरमुले, देशमुख यांचा समावेश होता.