हत्तीअंबीरे यांनी परभणीतील दिव्यांगांसह पाचशे गरजू,गरीब,मजुरांना  दिला मदतीचा हात

हत्तीअंबीरे यांनी परभणीतील दिव्यांगांसह पाचशे गरजू,गरीब,मजुरांना  दिला मदतीचा हात
================
नवनिर्वाचित खासदार राजीव भाऊ सातव यांच्या मार्गदर्शनांनुसार परभणी येथील समाजसेवेचे व्रत घेऊन सतत कार्यरत असलेले आयु. सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांच्याकडून लॉकडाऊन च्या काळात अपंगाना व  ज्यांच्याकडे  रेशन कार्ड नाही अशा मजूर,गरीब,गरजू  कामगारांना  मदतीचा हात पुढे केला आहे .


कोरोना रोगाच्या महामारीची संपूर्ण जगात सुरू झालेली साथ आणि त्या साथीचे भारतात वाढत चाललेले संक्रमण पाहता देशात सुरू असलेली संचारबंदीमुळे अर्थिक परिस्थितीने गांजलेल्या सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे. मोलमजुरी करून परिवाराची गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या समस्या दिवसंदिवस वाढत चालल्या आहेत.


घरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा नाही चूल कशी पेटवावी हा समोर पडलेला प्रश्न असताना सिध्दार्थ हत्तीअंबिरे  यांनी ५०० कुटुंबांना मोफत अन्नधान्य देऊन त्यांना आधार दिला आहे.


कोरोना आपत्तीमुळे देशभरात  संचारबंदी आणि  लॉक डाऊन  सुरू आहे  अशा परिस्थितीत  अनेक काम केल्या शिवाय ज्यांची चूल पेटत नाही, ज्यांचे हातावर पोट असलेले अनेक संसार अडचणीत सापडलेले आहेत, ज्यांच्या कडे राशन कार्ड नाही अशा ५०० परिवाराला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे. ज्या मध्ये १० किलो गव्हाचे पीठ, ५ किलो तांदूळ,१ किलो तुरीची डाळ, १ लिटर गोडेतेल, १ किलो मीठ व   कांदा, मिरची, मसाला, अशी किट जी एका छोट्या कुटुंबाला साधारणतः पंधरा दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप करून सामाजिक उत्तरदायित्वाचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. संकटकाळी दिलेला हा आधार माणुसकीचा खरा पाया असतो.  
गरीब,गरजू ,मजूर ,कामगार असलेल्या समाज बांधवांना सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांनी जीवनावश्यक वस्तूचे स्वबळावर वाटप करून दानपारमिता या बुद्ध-धम्म तत्वाचे अनुसरण केले आहे.


अनेक उद्योगधंदे ठप्प असल्याने नागरिकांच्या हाताशी दोन पैसेही नाहीत. अशा सर्वच गरजुंना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. दोन घास पोटात असतील तर प्रत्येक संकटाचा सामना करण्याची हिंमत माणसात येते.सगळ्यात मोठी भूक ही पोटाची आहे. ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपल आयुष्यभर झगडत असतो पण सध्याची परिस्थिती ही आणीबाणी सारखी आहे.
हाताला काम नाही.घरा बाहेर पडायचे नाही अश्या परिस्थितीत खायचे काय हा प्रश्न गरिबांना भेडसावत आहेत.
सरकार त्यांच्या पद्धतीने उपाययोजना करत आहे. पण सध्या नागरिकांच्या जीवापेक्षा मौल्यवान दुसरं काहीच असू शकत नाही.  गरीब व गरजू लोकांना दोन वेळेचं अन्न मिळणं ही सध्याची प्राथमिकता आहे. त्यात माझा छोटासा खारीचा वाटा असावा असी भावना ठेऊन सामाजिक बांधीलकी सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांनी जपली आहे.


 याचाच भाग म्हणून आज सकाळी ९ वाजता प्रशासकीय इमारत परभणी येथे २५ दिव्यांगांना १५ दिवस पूरेल इतक्या जीवनावश्यक वस्तुंचे व्यक्तिगत अंतराचा नियम पाळून वाटप करण्यात आले. या वितरण प्रसंगी प्रा.डॉ.संजय जाधव, प्रा. डॉ. प्रवीण खरात, प्रा. सुनील तुरुकमाने मकरंद बाणेगावकर, 
रमेश सिद्धेवाड,विशाल देशमुख, आर जी गायकवाड समाज कल्याण विभाग जी.प. प्रशाद शिंदे, सचिन सवणेकर, राजेश कारणवाढ इत्यादी उपस्थित होते.